ज्योतिषशास्त्रामध्ये एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये स्थित ग्रहांचे विश्लेषण केले जाते आणि त्याच्या जीवनाबद्दल आणि व्यक्तिमत्त्वाबद्दल सांगितले जाते. त्याचप्रमाणे, सामुद्रिक शास्त्रात, एखाद्या व्यक्तीच्या अवयवांची रचना आणि तीळ त्याच्या जीवनाबद्दल आणि आर्थिक स्थितीबद्दल सांगितले आहे. सामुद्रिक शास्त्राची रचना समुद्र ऋषींनी केली होती, म्हणून त्याला सामुद्रिक शास्त्र असे म्हणतात. आज आम्ही तुम्हाला भुवयांच्या आकारावरून एखाद्या व्यक्तीला कसे ओळखू शकतो हे सांगणार आहोत. जाणून घेऊया…
भुवया आपसात जोडलेल्या असतील तर:
सामुद्रिक शास्त्रानुसार ज्या लोकांच्या भुवया आपसात जोडलेल्या असतात, अशा लोकांची बुद्धिमत्ता खुप चांगली असते ते महत्त्वाकांक्षी असतात. हे लोक नेहमी स्वतःच्या हिताचा आणि प्रगतीचा विचार करतात. हे लोक बुद्धीचा वापर करून इतरांकडून काम करवून घेतात.
सामुद्रिक शास्त्र: डोळ्यांचा रंग सांगतो व्यक्तीचा स्वभाव अन् नशीब, तपकिरी डोळे असणारे लोक…
आर्थिकदृष्ट्या मजबूत:
ज्या लोकांच्या भुवया काळ्या रंगांच्या असतात, ते लोक प्रतिभावान आणि कलाप्रेमी असतात. तसेच, हे लोक जीवनाचा पुरेपूर आनंद घेतात. त्याचबरोबर त्यांचे छंद महाग असतात. असे लोके नेहमी त्यांच्या करिअरकडे लक्ष देतात.
आर्थिकदृष्ट्या कमकुवत:
असे मानले जाते की ज्या लोकांच्या भुवया थोड्या खाली-वर असतात, अशा लोकांना आयुष्यभर कष्ट करूनही मेहनतीनुसार यश मिळत नाही. ते आर्थिकदृष्ट्या कमकुवत राहतात. तसेच, या लोकांना खूप लवकर राग येतो. या लोकांना त्यांच्या कामात ढवळाढवळ केलेली आवडत नाही. त्यांना स्वतंत्र जगायला आवडतं.
भुवया जाड असल्यास:
सामुद्रिक शास्त्रानुसार ज्या लोकांच्या भुवया जाड असतात, अशा व्यक्ती थोड्या गुंतागुंतीच्या स्वभावाच्या असतात. यांच्या मनात काहीतरी चालू असंत आणि बाहेर काहीतरी वेगळंच. या लोकांना समजणं कठीण आहे.
विरळ भुवया असल्यास:
सामुद्रिक शास्त्रात विरळ भुवया असलेल्या लोकांचे वर्णन गंभीर स्वभावाचे असल्याचं केलंय. असे म्हटले जाते की विरळ भुवया असलेले लोक त्यांच्या भविष्याबद्दल खूप विचार करतात आणि या लोकांना घाईत निर्णय घेणे आवडत नाही.