scorecardresearch

सामुद्रिक शास्त्र: पायावर तीळ असणं मानलं जातं शुभ; गुडघ्यावर तीळ असणाऱ्यांचा असतो शांत स्वभाव, तर टाचेवर…

उजव्या मांडीवर तीळ असणारे लोक खूप आकर्षक असतात.

(फोटो संग्रहित)

ज्योतिष शास्त्रात ज्याप्रमाणे, एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये उपस्थित असलेल्या ग्रहांचे विश्लेषण करून, त्याचे भविष्य आणि स्वभाव सांगितले जाते. त्याचप्रमाणे सामद्रिकशास्त्रात मानवी शरीरावर उपस्थित असलेल्या अवयवांच्या रचनेच्या आधारे भविष्य आणि व्यक्तिमत्त्व सांगितले जाते. आज आपण पायावरील तीळाबद्दल बोलणार आहोत.

सामुद्रिक शास्त्रानुसार, पायावर असलेले तीळ माणसाच्या आयुष्याशी संबंधित रहस्येही उघड करतात. अनेकदा पायवरील तीळ प्रवासाशी संबंधित असल्याचं म्हटलं जातं. पण पायावर तीळ म्हणजे केवळ प्रवास असाच असा अर्थ नसतो. त्याचे इतरही अनेक अर्थ आहेत असे सामुद्रिक शास्त्रात सांगितले आहे. पायांवर तीळ असल्याचे काय अर्थ आहेत, ते जाणून घेऊया.

आकर्षक व्यक्तिमत्व  –

जर एखाद्या व्यक्तीच्या उजव्या पायाच्या वरच्या भागावर म्हणजेच उजव्या मांडीवर तीळ असेल तर ती व्यक्ती खूप कामुक आहे, असे दर्शवते. असे लोक खूप आकर्षक असतात. त्यांना लोकांशी संवाद साधायला आवडते. हे लोक समोरच्या व्यक्तीला पहिल्याच भेटीतच वेड लावतात. त्यांना फिरायला आवडते. हे लोक जिथे जातात तिथे आपली छाप सोडतात.

कला प्रेमी –

ज्या व्यक्तीच्या पायाच्या उजव्या मांडीवर तीळ असतो, तो खूप कलात्मक असतो. सामद्रिकशास्त्रात असे मानले जाते की अशा लोकांना स्वयंपाक करणे आणि खाणे खूप आवडते. हे लोक आनंदी मानले जातात. हे लोक कला प्रेमी आणि कला जाणकार असतात. त्यांची समाजात वेगळी ओळख असते.

धैर्यवान आणि निर्भय:

सामद्रिकशास्त्रानुसार ज्या लोकांच्या उजव्या गुडघ्यावर तीळ असतो, असे लोक धैर्यवान आणि निर्भय असतात. या लोकांचं करिअर सैन्य आणि पोलिसात घडतं. हे लोक खूप असंवेदनशील असतात. ते हट्टी स्वभावाचे असल्याचे बोलले जाते. हे लोक अहंकारी असतात. एखाद्याच्या बोलण्याने ते लगेच दुखावले जातात आणि या लोकांना लगेच राग येतो.

शांत स्वभाव –

उजव्या पायाच्या खालच्या भागात म्हणजे गुडघ्याच्या खाली आणि टाचेच्या वर तीळ असेल तर असे लोक साहसी असतात, असे म्हणतात. त्यांना आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदात घालवायचा असतो. तसेच, हे लोक जीवनात शांतता शोधतात. शांततेसाठी ते काहीही करायला तयार असतात. हे लोक प्रतिकूल परिस्थितीतही शांत राहतात.

डाव्या गुडघ्यावर तीळ असल्यास:

सामद्रिकशास्त्रात असे म्हटले आहे की ज्या लोकांच्या डाव्या गुडघ्यावर तीळ असतो, ते खूप भावुक असतात. असे लोक प्रामाणिक आणि लवकर मैत्री करणारे असतात. ते इतरांशी मोकळेपणाने बोलतात आणि समोरच्याकडूनही तशीच अपेक्षा करतात.

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Samudra shastra oceanography having mole on leg hrc

ताज्या बातम्या