sankashti Chaturthi 10 October 2025: आज संकष्टी चतुर्थी: संकष्टी चतुर्थीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. वैदिक दिनदर्शिकेनुसार, दर महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थीचे व्रत दरवर्षी केले जाते. हे व्रत विघ्न दूर करणाऱ्या गणेशाला समर्पित आहे. या दिवशी श्रीगणेशाची भक्तीभावाने आराधना, प्रार्थना केली जाते. यामुळे मुलांसाठी दीर्घायुष्य आणि आनंद तसंच समृद्धी मिळते. याव्यतिरिक्त वक्रतुंड संकष्टी चतुर्थीच्या उपवासात श्रीगणेशासह चंद्र देवाचीही पूजा केली जाते. रात्री चंद्राला पाणी अर्पण करून व्रत सोडले जाते. संकष्टी चतुर्थीला उपवास आणि मनोभावे पूजा केल्याने त्रास आणि दु:ख दूर होते असे मानले जाते. १० ऑक्टोबरच्या या चतुर्थीबाबत आणि चंद्रोदयाची वेळ याबाबत सविस्तर जाणून घ्या…
वैदिक कॅलेंडरनुसार, कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी ९ ऑक्टोबर रोजी १० वाजून ५४ मिनिटांनी सुरू होते. ही तिथी १० ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७ वाजून ३८ मनिटांनी संपेल. म्हणूनच उदयतिथीनुसार, संकष्टी चतुर्थी १० ऑक्टोबर रोजी केली जाईल. या वर्षी वक्रतुंड संकष्टी चतुर्थीला सिद्ध योग निर्माण होत आहे. वक्रतुंड संकष्टीला कार्तिक संकष्टी चतुर्थी असेही म्हणतात.
शुभ मुहूर्त
संकष्टी चतुर्थीचा शभ काळ सकाळी ११ वाजून ४४ मिनिटे ते दुपारी १२ वाजून ३१ मिनिटांपर्यंत असेल. या काळात तुम्ही पूजा करू शकता. शिवाय संकष्टी चतुर्थीला कृतिका नक्षत्र सुरू होत आहे, जे संध्याकाळी ५ वाजून ३१ मिनिटांपर्यंत आहे.
सिद्ध योगातील चतुर्थी
यावेळी वक्रतुंड संकष्टी चतुर्थीला सिद्ध योग तयार होत आहे. पहाटेपासून उपवासाच्या दिवशी संध्याकाळी ५ वाजून ४१ मिनिटांपर्यंत सिद्ध योग प्रभावी असतो. त्यानंतर व्यतिपात योग तयार होईल. उपवासाच्या दिवशी पहाटेपासून संध्याकाळी ५ वाजून ३१ मिनिटांपर्यंत कृतिका नक्षत्र प्रभावी आहे, त्यानंतर रोहिणी नक्षत्र येते.
चंद्रोदयाची वेळ
दिवसभर उपवास केल्यानंतर संध्याकाळी चंद्राची पूजा केली जाते आणि अर्घ्य अर्पण केले जाते. रात्री ८ वाजून १३ मिनिटांनी चंद्रोदयाची वेळ आहे. यावेळी कच्चे दूध पाण्यात, संपूर्ण धान्य आणि फुले मिसळून चंद्र देवाला अर्पण केले जाते. त्यानंतर उपवास सोडला जातो.
संकष्टीला राहुकाल
या उपवासाच्या दिवशी राहू काळ सकाळी १० वाजून ४१ मिनिटांनी ते दुपारी १२ वाजून ८ मिनिटांपर्यंत आहे. राही काळादरम्यान तुम्ही कोणतेही शुभ कार्य करून नये.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)