Shani Dev Gochar 2025: वैदिक ज्योतिषशास्त्रात शनी महाराज हे कर्म व न्याय देवता मानले जातात. शनीदेवांच्या स्थितीला खूप महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रानुसार शनी महाराज चार पावलांनी राशींमध्ये भ्रमंती करत असतात. सोने, चांदी, तांबे व लोह (लोखंड) अशा स्वरूपात ही पावले ओळखली जातात. याचा प्रभाव प्रत्येक राशीवर वेगवेगळा असू शकतो. शनीची ही पावले आपल्या स्थितीनुसार शुभ आणि अशुभ फळ प्रदान करतात. ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार, आता २०२५ मध्ये शनीदेव चांदीच्या पावलाने भ्रमण करत आहेत.

ज्योतिषशास्त्रानुसार २०२५ हे वर्ष अनेकांसाठी गेम चेंजर ठरणार असून, शनीचं मोठं संक्रमण मार्च महिन्यात झालं आहे. २९ मार्च या दिवशी तब्बल अडीच वर्षांनंतर शनीने राशीबदल केलाय. २९ मार्च रोजी रात्री ११:०१ वाजता शनीने मीन राशीत प्रवेश केला आहे. चांदीच्या पावलांनी या राशींमध्ये शनी महाराजांनी प्रवेश केला आहे, त्यामुळे शनी महाराज काही राशींच्या व्यक्तींचं नशीब सुखांनी उजळवणार असून त्यांना भरघोस आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. जाणून घेऊयात भाग्यशाली राशी कोणत्या…

शनी निघाले चांदीच्या पावलांनी, ‘या’ राशींच्या व्यक्तींचं नशीब पालटणार?

कर्क

कर्क राशीच्या व्यक्तींसाठी शनीचं चांदीच्या पावलांनी चालणं लाभदायी ठरू शकतं. नोकरदार लोकांना या काळात वेतनवाढ आणि पदोन्नती मिळू शकते. व्यवसायात प्रचंड यश आणि नफादेखील मिळू शकतो. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या काळात सकारात्मक परिणाम मिळू शकतात. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते.

वृश्चिक

शनी चांदीच्या पावलांनी येणं वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी अतिशय शुभ ठरू शकते. या राशीच्या लोकांना अपार धनलाभ होण्याची शक्यता आहे. जे काम हाती घ्याल त्यात यश मिळू शकते. या काळात नोकरी-व्यवसायात चांगली प्रगती होऊ शकते. यावेळी नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात. या काळात या राशीतील लोकांना व्यवसायात फायदा होण्याची शक्यता आहे.

कुंभ

कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी शनीचा चांदीचा पाय शुभ परिणाम देणारा ठरू शकतो. शनीच्या कृपेनं या राशीच्या व्यक्तींची सगळी कामं मार्गी लागू शकतात. या राशीच्या लोकांना करिअरच्या क्षेत्रात मोठा फायदा होऊ शकतो. यावेळी प्रमोशनसह पगार वाढू शकतो. व्यावसायिकांना अडकलेले पैसे मिळू शकतात. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. तुम्हाला परदेशात जाण्याची संधीही मिळू शकते. उत्पन्नात घसघशीत वाढ होण्याची शक्यता आहे.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे, लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)