Shani Pluto Ardhakedra yog: ज्योतिषशास्त्रात शनीला कर्मफळदाता आणि न्यायप्रिय देवता म्हटले जाते. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत शनी शुभ स्थितीत असतो अशा व्यक्तींना आयुष्यात अनेक सुख-सुविधा प्राप्त होतात. तसेच शनी अशुभ स्थितीत असल्यास व्यक्तीला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. तसेच चांगले कर्म करणाऱ्या व्यक्तींवर शनीची नेहमी शुभ दृष्टी असते. नवग्रहांमध्ये शनी सर्वात मंद गतीने चालणारा ग्रह आहे. त्याला एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करण्यासाठी जवळपास अडीच वर्षाचा कालावधी लागतो.

ज्योतिषशास्त्रानुसार, सध्या प्लूटो हा ग्रह शनीच्या मकर राशीत असून तो एका राशीत १७-१८ वर्ष राहतो. १ नोव्हेंबर २०२१ रोजी त्याने मकर राशीत प्रवेश केला जो २७ मार्च २०३९ पर्यंत या राशीत असेल. दरम्यान, येत्या २२ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजून २४ मिनिटांनी शनी आणि यम एकमेकांपासून ४५ अंशावर असतील. ज्यामुळे अर्धकेंद्र योग तयार होईल. या योगामुळे काही राशीच्या व्यक्तींचे भाग्य चमकेल.

शनी-प्लूटो चमकवणार ‘या’ राशींचे भाग्य

कन्या

कन्या राशीच्या व्यक्तींसाठी शनी आणि प्लूटो या ग्रहांनी निर्माण केलेला अर्धकेंद्र योग खूप फायदेशीर असेल. या राशींना वडिलोपार्जित संपत्तीत लाभ होतील. कर्ज कमी होईल. नोकरी, व्यवसायात फायदा होईल. आयुष्यातील अनेक अडचणी दूर होतील. प्रत्येक कामात यश मिळेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील

तूळ

हा योग तूळ राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायी ठरेल. या काळात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. अडकलेली कामे पूर्ण होतील, करिअरमध्ये हवे तसे यश मिळविता येईल. मनातील इच्छा पूर्ण होतील. नव्या कामाची सुरुवात होईल. कामातील अडथळे दूर होतील. या राशीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धेत यश मिळेल. यावेळी तुमचे व्यक्तिमत्त्व सुधारेल. कामाच्या ठिकाणी दिले गेलेले लक्ष्य पूर्ण कराल. धार्मिक कार्यात यश मिळेल.

हेही वाचा: शश राजयोग देणार पैसाच पैसा; मार्चपर्यंत ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार

मीन

मीन राशीसाठी देखील हा योग अनेक बदल घडवून आणेल. या काळात मानसिक आणि शारीरिक तणाव कमी होईल. अडकलेले पैसे परत मिळतील. स्पर्धा परिक्षेत यश मिळेल. जोडीदाराची प्रत्येक गोष्टीत साथ मिळेल. जुने वाद मिटतील. व्यवसायात आकस्मिक धनलाभ होतील. दूरचे प्रवास घडतील. तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना हवे तसे यश मिळेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)