Shani Chandra Yuti on 6 October: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह ठराविक काळानंतर गोचर करतात आणि त्यामुळे चांगले-वाईट योग तयार होतात. याचा मोठा परिणाम माणसांच्या जीवनावर आणि देश-विदेशावरही होतो.

सध्या न्याय आणि शिक्षा देणारे शनी देव मीन राशीत आहेत. ६ ऑक्टोबरला चंद्र देवही मीन राशीत जातील. त्यामुळे कुंभ राशीत शनि आणि चंद्र यांची युती होईल. या युतीमुळे “विष योग” तयार होईल. यामुळे काही राशींच्या जीवनात चढ-उतार येऊ शकतात. पैसे अडकू शकतात आणि तब्येतही बिघडू शकते.

मेष राशी (Aries Horoscope)

शनी आणि चंद्राची युती तुमच्यासाठी थोडी त्रासदायक ठरू शकते. कारण ही युती तुमच्या गोचर कुंडलीत १२व्या स्थानावर होत आहे. त्यामुळे या काळात खर्च वाढू शकतो. ज्यांचा पार्टनरशिपमध्ये व्यवसाय आहे त्यांना नुकसान होऊ शकते. नोकरीत बॉस नाराज होऊ शकतात, त्यामुळे कामाचा ताण वाढेल. या काळात पैशांबाबत कोणताही धोका घेऊ नका आणि सट्टेबाजीपासून दूर राहा. पण जर तुम्ही सावधगिरी बाळगली तर चांगले परिणामही मिळू शकतात. याच वेळेत तुमच्यावर एखादा आरोपही होऊ शकतो.

सिंह राशी (Leo Horoscope)

तुमच्यासाठी विष योग थोडा प्रतिकूल ठरू शकतो. कारण हा योग तुमच्या राशीपासून अष्टम भावात होत आहे. त्यामुळे या काळात गुप्त आजार होऊ शकतो. समाजात तुमची प्रतिमा जपून ठेवावी लागेल. पैशांबाबत कोणताही धोका घेऊ नका, तो तुमच्या बाजूने जाणार नाही. काही गोष्टींवरून तणाव येऊ शकतो. काम-धंदा हळू चालेल. तसेच या काळात पैसा अडकू शकतो.

मीन राशी (Pisces Horoscope)

तुमच्यासाठी विष योग काही प्रमाणात चांगला ठरू शकतो. कारण हा योग तुमच्या राशीपासून पहिल्या स्थानी होत आहे. या काळात कुणालाही उधार पैसे देऊ नका, नाहीतर पैसे अडकू शकतात. फाजील खर्च होण्याची शक्यता आहे. जीवनसाथीची तब्येत बिघडू शकते आणि त्यांच्यासोबत काहीसा तणाव होऊ शकतो. पैशांच्या बाबतीत जास्त सावध राहणे गरजेचे आहे. अनावश्यक खर्च टाळा आणि कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीपासून सावध रहा.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)