Saturn Retrograde: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनीची चाल ज्या राशींच्या गोचर कक्षेत होत असते त्यांचे आयुष्य वेळीवेळी बदलण्याची शक्यता असते. एखाद्या रंकाचा राजा व राजाचा भिक्षुक बनवण्याची क्षमता शनीकडे असते अशी धार्मिक मान्यता आहे. असं असलं तरी शनी फक्त कष्टदायी किंवा क्लेशकारकच प्रभाव टाकतात असे नाही. उलट शनी हे कलियुगातील न्याय व कर्मदेवता म्हणून ओळखले जातात. शनीच्या प्रभावाने एखाद्याला त्याच्या कर्मानुरूप फळ मिळत असते फक्त त्याची तीव्रता ही इतर ग्रहांच्या प्रभावापेक्षा अधिक असते. आता पुढील २६ दिवसानंतर शनीच्या चालीत मोठा बदल होणार आहे. शनीदेव १८० अंशात गोल फिरून यापुढे नोव्हेंबर पर्यंत उलट चाल करणार आहेत. २९ जूनला शनी महाराज वक्री होतील तर १५ नोव्हेंबरपर्यंत ते याच वक्र चालीने कुंभ राशीत भ्रमण करणार आहे. आतापर्यंत ज्या राशींवर शनीचा अप्रत्यक्ष प्रभाव होता त्यांना आता थेट फायदा व तोटा अनुभवावा लागणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार २९ जून पासून नेमकं कुणाला लाभ व कुणाला तोटा होणार याची समीकरणे पाहूया..
शनी उलट चालताना ‘या’ राशींना देणार थेट लाभ
वृश्चिक रास (Scorpio Rashi Bhavishya)
पुढील प[च महिने शनी कुंभेत असले तरी वृश्चिक राशीच्या गोचर कुंडलीत अतिशय मोक्याच्या ठिकाणी प्रभावी असणार आहेत. त्यामुळे वृश्चिक राशीला येत्या काळात प्रचंड मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. हा लाभ तुमच्याकडील आर्थिक स्रोतांमधून, आरोग्याच्या संबंधित स्वरूपात अनुभवता येऊ शकतो. आपल्याला व्यवसायासाठी आवश्यक भांडवल सहज प्राप्त होऊ शकते. कामाच्या ठिकाणी नवनवीन संधी आपले दार ठोठावतील. आपल्या वाणीच्या माध्यमातून लाभ संभवतो. प्रेम संबंध व नाती सुधारतील, गैरसमज दूर होतील. तुमचे वास्तव्याचे ठिकाण पुढील काही काळासाठी बदलण्याची शक्यता आहे.
तूळ रास (Libra Rashi Bhavishya)
या राशीसाठी सुद्धा येणारे पाच महिने अत्यंत फायद्याचे असणार आहे. तुम्ही सुरु केलेल्या कामांना गती व योग्य अपेक्षित परिणाम प्राप्त होतील. समाजात आपला मान सन्मान वाढीस लागेल. आर्थिक चणचण दूर होण्यासाठी पूर्व गुंतवणूक फायद्याची ठरू शकते. वाडवडिलांच्या माध्यमातून धनलाभ संभवतो. तुमच्या नशिबात पुढील पाच महिन्यात संतती सुख लिहिलेले आहे. मार्गातील अडथळे दूर होतील. नव्या नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी हा मोक्याचा कालावधी आहे. तुम्ही गुंतवणुकीवर भर दिल्यास येत्या काळात त्याचा द्विगुणित लाभ तुमच्याकडे येऊ शकतो.
कन्या रास (Virgo Rashi Bhavishya)
पुढील पाच महिने कन्या राशीच्या मंडळींना साधारण दर दिवशी आनंदाची बातमी प्राप्त होऊ शकते. आयुष्यात सकारात्मकता वाढीस लागेल. आरोग्यात सुधारणा होतील व जुने आजार तुमची पाठ सोडतील. ध्यानसाधना करण्याचा प्रयत्न करावा. मानसिक संतुलन राखण्यासाठी थोडे कष्ट घ्यावे लागतील. कुटुंबासह एखाद्या सहलीचा योग येऊ शकतो. खर्च वाढण्याची शक्यता आहे पण होणारा खर्च हा तुमचा कौटुंबिक नाती जपण्यासाठी व आनंद अनुभवण्यासाठी केलेली गुंतवणूक समजून केल्यास फार ताण जाणवणार नाही. जुनच्या शेवटाकडे आपली पदोन्नती किंवा पगारवाढ किंवा दोन्ही एकत्र होण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा<< ३ जून पंचांग: आश्विनी नक्षत्रात सुरु होणार आठवडा, झटपट कामे व खर्चाचा ताळमेळ, मेष ते मीन राशींचा सोमवार कसा जाईल?
‘या’ राशींसाठी मात्र शनी ठरतील क्लेशकारी
शनीची वक्री चाल चार राशींसाठी कदाचित थोडे वाईट प्रभाव घेऊन येऊ शकते. या राशींना विशेषतः आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. गुंतवणूक करताना कान, डोळे उघडून पैसे गुंतवा. मेष रास, मकर रास, कुंभ रास व मीन राशीला येत्या काळात संयम बाळगण्यासाठी विशेष कष्ट घ्यावे लागतील.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)