Shani Margi 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रात, शनी हा सर्वांत शक्तिशाली ग्रहांपैकी एक मानला जातो, जो सर्वांत संथ गतीने भ्रमण करतो. या ग्रहाला कर्मफळदाता, असेही म्हटले जातो. कारण- तो लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतो. राजाला रंक आणि रंकाला राजा बनवण्याची शक्ती शनीकडे आहे. शनी सध्या गुरूच्या मीन राशीत स्थित आहे, जो जून २०२७ पर्यंत या राशीत भ्रमण करेल. या काळात त्याची स्थिती बदलत राहील. जुलै महिन्यात शनी मीन राशीत वक्री होईल आणि सुमारे १३८ दिवस या राशीत स्थित राहील.

त्यात २८ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजून २० मिनिटांनी शनी मीन राशीत मार्गी येईल. शनी मार्गी होताच धन राजयोग निर्माण होईल. या राजयोगाने काही राशींच्या लोकांचे नशीब चमकू शकते. पण, कोणत्या राशींच्या लोकांना धन राजयोगाचा फायदा होईल ते जाणून घेऊ…

मकर

शनीच्या धन राजयोगाचा फायदा मकर राशीच्या लोकांना होऊ शकतो. या राशीच्या लोकांची दीर्घकाळापासूनची प्रलंबित कामे पुन्हा सुरू होऊ शकतात. त्यांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. कामानिमित्त प्रवासाची संधी मिळू शकते. त्यातून तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. मुलांमुळे सुरू असलेल्या समस्या संपू शकतात. बौद्धिक क्षमता वाढेल, ज्यामुळे तुम्ही अनेक मोठे निर्णय घेऊ शकता. कुटुंबात सुरू असलेल्या अडचणी संपतील आणि त्यामुळे वातावरण आनंददायी राहणार आहे. तुम्हाला मानसिक शांती मिळू शकते. तुम्हाला परदेशात जाण्याची संधीदेखील मिळू शकते; पण खर्चही वाढू शकतो. व्यवसायातही तुम्हाला नफा मिळू शकतो. लव्ह लाईफ खूप आनंदी असेल.

कुंभ

शनीचे मार्गी होणे कुंभ राशीच्या लोकांना शुभ ठरू शकते. सध्या कुंभ राशीचा साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू आहे. त्यामुळे कुंभ राशीच्या लोकांसाठी धन राजयोग अनुकूल ठरू शकतो. या राशीच्या लोकांना आर्थिक, मानसिक, कौटुंबिक समस्यांपासून आराम मिळू शकतो. मानसिक ताण थोडा कमी होऊ शकतो, ज्यामुळे तुम्ही तुमच्या भविष्याबद्दल निर्णय घेऊ शकता. व्यवसायात भरपूर नफा मिळू शकतो. वैवाहिक जीवनात आनंदाचे क्षण येतील. या काळात जोडीदाराबरोबर तुम्ही चांगला वेळ घालवू शकता; पण आरोग्याबाबत थोडे सावध राहण्याची गरज आहे. व्यायाम, योगा, आहार यांची विशेष काळजी घ्या. नोकरी करणाऱ्या लोकांनाही खूप चांगले फायदे मिळू शकतात. तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांसह चांगले संबंध निर्माण करू शकता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मिथुन

धन राजयोगाने मिथुन राशीच्या लोकांच्या जीवनातही ‘अच्छे दिन’ येतील. या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. आयुष्यात सुरू असलेल्या कोणत्याही समस्या किंवा आव्हाने हळूहळू कमी होऊ शकतात. बराच काळ अडकलेले काम आता पूर्ण होऊ शकते. व्यवसायाच्या क्षेत्रातही फायदा मिळू शकतो. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीमुळे आता व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. नोकरी करणाऱ्यांसाठीही हा काळ शुभ ठरू शकतो. तुम्ही केलेली गुंतवणूक आता आर्थिक लाभ देऊ शकते. वैवाहिक जीवनात आनंद राहील.