ज्योतिष शास्त्रात दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा शनिदेव एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात, तेव्हा कोणत्या ना कोणत्या राशीवर साडेसातीचा प्रभाव पडतो किंवा एखाद्या राशीवरील साडेसाती संपते. १७ जानेवारी २०२३ ला शनिदेव कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत. यानंतर काही राशींची साडेसाती सुरु होणार आहे. या राशी कोणत्या आहेत आणि त्यांनी काय खबरदारी घ्यायला हवी हे जाणून घेऊया.

ज्योतिष शास्त्रानुसार शनिदेवाला कर्मानुसार फळ देणारे देव मानले जाते. त्याचबरोबर ते वय, दुःख, आजार, वेदना, विज्ञान प्रगती, इत्यादींचे कारकही मानले जातात. मकर आणि कुंभ राशीचा स्वामी शनि असून तूळ राशीत शनिदेव श्रेष्ठ मानले जातात तर मेष ही त्यांची दुर्बल राशी आहे. तुमच्या कुंडलीत शनि कोणत्या घरामध्ये स्थित आहे हे पाहणे महत्त्वाचे आहे. त्यानुसार साडेसातीचे फळ मिळते.

Guru Margi 2022 : २४ नोव्हेंबरनंतर सर्वच राशींचे दिवस पलटू शकतात; काहींना मिळणार शुभ वार्ता, तर काहींच्या अडचणीत होणार वाढ

वैदिक ज्योतिषानुसार १७ जानेवारी २०२३ला शनिदेव कुंभ राशीमध्ये प्रवेश करणार असून यामुळे काही राशींच्या लोकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. यामध्ये मकर, कुंभ आणि मीन राशींच्या लोकांचा समावेश असेल. या काळात व्यापारामध्ये नुकसान होऊ शकते. तसेच, सुरळीत चाललेले कामही बिघडू शकते. ऑफिसच्या ठिकाणी बॉस किंवा सहकाऱ्यांशी मतभेद होण्याची संभावना आहे. त्याचबरोबर या दिवसांमध्ये या राशींच्या लोकांना आपल्या आरोग्याकडेही विशेष लक्ष देण्याची गरज आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)