Shani Purva Bhadrapada Nakshatra 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, शनी देव एका विशिष्ट कालावधीनंतर राशी आणि नक्षत्र बदलतो. त्यात शनी हा सर्वांत संथ गतीने भ्रमण करणारा ग्रह आहे, जो अडीच वर्षांनी एका राशीतून दुसऱ्या राशीत जातो. त्यामुळे शनीला राशिचक्र पूर्ण करण्यासाठी ३० वर्षे लागतात. शनी देव सध्या उत्तराभाद्रपद नक्षत्रात भ्रमण करत असून, तो ऑक्टोबर महिन्यात पूर्वाभाद्रपद नक्षत्रात प्रवेश करील. शनीच्या या नक्षत्रप्रवेशाने १२ पैकी काही राशींचे भाग्य चमकू शकते. त्यांना अफाट पैशासह पद आणि प्रतिष्ठा मिळण्याची शक्यता आहे. नेमक्या कोणत्या राशींना याचा फायदा होईल ते जाणून घेऊ….
मकर
शनी देवाचा नक्षत्रबदल मकर राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. या काळात तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल. उच्च शिक्षण, संशोधन किंवा आध्यात्मिक कार्यात प्रगती साधता येईल. तुम्हाला परदेश प्रवास करू शकता किंवा नवीन संधी मिळवू शकता. त्याच वेळी तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. वैवाहिक जीवनात गोडवा आणि आनंद येईल. जोडीदारासह नवीन ठिकाणी भेट देऊ शकता. तुम्हाला तुमच्या कोणत्याही कामात भावंडांचे पूर्ण सहकार्य मिळेल.
वृषभ
शनी देवाचा नक्षत्रबदल वृषभ राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकतो. या काळात तुम्हाला करिअर आणि व्यवसायात चांगले यश मिळू शकते. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्रशंसा होऊ शकते. व्यावसायिकांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होईल. यावेळी नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते. नोकरदार आणि व्यावसायिकांसाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. आर्थिक गुंतवणुकीतून नफा मिळू शकतो; पण कोणतीही गुंतवणूक करताना थोडी काळजी घ्या.
मिथुन
शनी देवाचा नक्षत्रबदल मिथुन राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. या काळात बेरोजगार लोकांना नोकरी मिळू शकते. नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. कामाच्या ठिकाणी तुमची सौम्य; पण प्रभावी संवाद शैली लोकांना प्रभावित करील. जे क्रिएटिव्ह फिल्ड, शिक्षण, फॅशन किंवा आरोग्य सेवेत आहेत, त्यांना यावेळी विशेष सन्मान आणि पदोन्नती मिळू शकते. जे प्रशासन, राजकारण, मीडिया, व्यवसाय किंवा व्यवस्थापन क्षेत्रात आहेत, त्यांच्यासाठी हा चांगला काळ असेल.