Gudhipadwa Yearly Horoscope: २२ मार्च २०२३ म्हणजेच आज गुढीपाडव्यापासून श्री शालिवाहन शके १९४५ शोभन नाम संवत्सर प्रारंभ होत आहे. गुढीपाडवा म्हणजे चैत्र शुक्ल पक्षातील प्रतिपदा. या वर्षी चैत्र महिन्याची प्रतिपदा २१ मार्च २०२३ रोजी रात्री १०.५३ पासून सुरू होते आणि २२ मार्च २०२३ रोजी रात्री ८.२१ वाजता समाप्त होईल. उदयतिथीप्रमाणे २२ मार्च रोजी गुढीपाडवा सण साजरा केला जात आहे. गुढीपाडव्यापासून हिंदू धर्माचे नूतन वर्ष सुरूवात झाली आहे. यंदाच्या गुढीपाडव्याला ग्रहतिथीनुसार तब्बल पाच राजयोग जुळून आले आहेत. शनिने कुंभ राशीत शश राजयोग तर गुरूने मीन राशीत हंस राजयोग साकारला आहे. बुध व सूर्याची युतीने बुधादित्य राजयोग तयार झाला आहे आणि मीन राशीतच त्रिगही योग सुद्धा जुळून आला आहे. याशिवाय गुरु व चंद्राच्या युतीने साकारलेला गजकेसरी राजयोग सुद्धा प्रबळ बनत आहे. या पाच राजयोगांसह तीन राशींच्या भाग्याचे दार उघडणार असे दिसत आहे. या राशी पूर्ण वर्ष मालामाल होण्याची चिन्हे आहेत. तुमच्या राशीला नेमका कसा लाभ होऊ शकतो हे ही पाहुयात…

गुढीपाडव्यापासून ‘या’ तीन राशींचे अच्छे दिन सुरु?

तूळ रास (Libra Zodiac)

पाच पैकी मुख्य चार राजयोग हे आपल्या राशीच्या सहाव्या स्थानी तयार होत आहेत हे स्थान भाग्याचे असल्याने येत्या काळात तुम्हाला प्रत्येक कामात नशिबाची साथ लाभू शकते. तुमचे शत्रू दूर होण्यास हा काळ अधिक उपयुक्त ठरू शकतो. जे लोक तुमच्या विरुद्ध होते तेच तुमच्या पाठीशी उभे राहतील मात्र त्याआधी तुम्हाला स्वतः एक पाऊल पुढे टाकावे लागू शकते. हिंदू नववर्षात तुम्हाला वाडवडिलांच्या संपत्तीची मोठी मदत होऊन आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते. तुम्हाला कर्जमुक्त होता येईल. तूळ राशीच्या भाग्यात विवाह योग सुद्धा भक्कम आहे.

Till 1st June 2024 Mangal Gochar in Meen rashi Mahavisfot Angarak Yog on Hanuman Jayanti
१ जूनपर्यंत मीन राशीत ‘महाविस्फोट अंगारक’ योग; ‘या’ राशींचा भाग्योदय; प्रचंड धनासह प्रत्येक कामात मिळेल गती
Rajyog Lakshmi Narayan Rajyoga
मे महिन्यात निर्माण होईल लक्ष्मी नारायण राजयोग! या तीन राशींचा सुरु होईल सुवर्णकाळ, मिळेल बक्कळ पैसा
Sun transit in mesh surya gochar 2024
१ वर्षानंतर सूर्य-मंगळाची मेष राशीत युती, ‘या’ तीन राशींच्या लोकांना मिळेल बक्कळ पैसा? प्रत्येक क्षेत्रात मिळू शकेल यश
1 to 7 April 2024 Weekly Horoscope
७ एप्रिलपर्यंत लक्ष्मी नारायणासह ३ राजयोग बनल्याने कर्क- कन्यासह ‘या’ राशी जगतील अच्छे दिन, १२ राशींचे भविष्य वाचा

धनु रास (Dhanu Zodiac)

१७ जानेवारी २०२३ ला धनु राशीला शनीच्या साडेसातीतून मुक्ती मिळाली आहे यामुळे येणारे संपूर्ण वर्ष हे आपल्या प्रचंड फायद्याचे ठरू शकते. शनिदेव आपल्यावर मेहेरबान ठरू शकतात. तुमचे मित्र तुमच्या प्रचंड कामी येऊ शकतील. स्वभाव दोषामुळे तुम्ही काहींना दुखावू शकता. धनु राशीच्या चतुर्थ स्थानी चार राजयोग तयार होत आहेत. हे भौतिक सुख स्थान मानले जाते. त्यामुळे तुम्हाला या काळात सर्व भौतिक सुखं मिळू शकतात. यासोबतच तुम्हाला मातृपक्षाकडून आनंद आणि लाभ होऊ शकतो. वाहन सुख मिळू शकते तर तुम्ही नवीन मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करू शकता.

हे ही वाचा<< १९२३ नंतर पहिल्यांदा जुळले चार महाराजयोग; ‘या’ 5 राशींचे नशीब पालटणार? बँक बॅलन्समुळे बदलू शकते आयुष्य

वृषभ रास (Taurus Zodiac)

शनिदेव आपल्या राशीच्या गोचर कुंडलीत ११ व्या स्थानी गोचर करत आहेत तर हे राजयोग आपल्या राशीच्या लाभ स्थानी तयार होणार आहे. या स्थानी आपल्या राशीच्या धनस्वामींचे वास्तव्य आहे. येत्या काळात तुम्हाला तुमच्या बुद्धीच्या जोरावर प्रचंड धनलाभ मिळवता येऊ शकतो. तुमच्या मदतीने एखाद्याला आयुष्यात पुढे जाण्याची संधी लाभू शकते. वृषभ राशीच्या मंडळींना संतती प्राप्तीचे सुद्धा योग आहेत. नोकरदार मंडळींना रातोरात नशीब पालटण्याची संधी लाभू शकते तुम्ही किती गंभीरतेने या संधीकडे पाहता यावर सगळं काही अवलंबून असणार आहे. नव्या घराच्या खरेदीचे योग आहेत.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)