Shani Pradosh Vrat: ज्योतिषशास्त्रानुसार, दर महिन्याच्या शुक्ल व कृष्णपक्षातील त्रयोदशी म्हणजेच तेराव्या दिवशी शनि प्रदोष तिथी असते. शनिचा प्रदोष हा महादेव शंकराच्या उपासनेचा दिवस म्हणून ओळखला जातो. या तिथीला शंकराचे पूजन केल्यास दीर्घायुष्य लाभते अशी भाविकांची श्रद्धा आहे.तसेच शंकरासह शनिच्या उपासनेसाठी हा दिवस सर्वोत्तम मानला जातो. यादिवशी शनिची उपासना केल्यास शनिच्या ढैय्या (अडीच वर्षांचा संकटाचा कालावधी) ते साडेसातीच्या कालावधीत अशुभ प्रभाव कमी होण्यास मदत होते असेही मानले जाते. या महिन्यात शनि प्रदोष तिथी कधी आहे, शनि प्रदोषाचा मुहूर्त, मंत्र व पूजा विधी आपण जाणून घेऊयात..
शनि प्रदोष तिथी व शुभ मुहूर्त
- कार्तिक शुक्ल त्रयोदशी तिथी प्रारंभ – ५ नोव्हेंबरला संध्याकाळी ५ वाजून ५० मिनिट
- कार्तिक शुक्ल त्रयोदशी तिथी समाप्ती – ६ नोव्हेंबरला संध्याकाळी ४ वाजून ७ मिनिट
शनि प्रदोषाच्या मुहूर्तावर रुद्राभिषेक करण्याची पद्धत आहे, भाविक आपल्या श्रद्धेनुसार विविध पद्धतीने पूजा अर्चना करतात, या पूजेसाठी यंदा शुभ मुहूर्त ५ नोव्हेंबरला संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी सुरु होत असून रात्री ८ वाजून ३६ मिनिटांपर्यंत असणार आहे.
शनि प्रदोष मंत्र
ऊँ भगभवाय विद्महैं मृत्युरुपाय धीमहि तन्नो शनिः प्रचोद्यात्।
ऊँ श्रां श्रीं श्रूं शनैश्चाराय नमः।
शनि प्रदोष व्रत का करावे?
शिव पुराणानुसार शनि प्रदोषाचे व्रत हे आरोग्य व धनप्राप्तीशी संबंधित मानले जाते. संतती प्राप्तीसाठी हे व्रत ठेवण्याची श्रद्धा आहे. असे म्हणतात की जर लग्नाचे योग जुळत नसतील तरी शनि प्रदोष व्रत केल्यास विवाह योग जुळण्याच्या दिशेने प्रगती होते. शनि प्रदोष व्रताला शनिव यमदेवाची पूजा करण्यालाही खास महत्त्व आहे. आकस्मिक मृत्यू टाळण्यासाठी यमाचे पूजन करण्याची भाविकांची श्रद्धा आहे.
शनि प्रदोष पूजा विधी
शनि प्रदोषाच्या दिवशी शक्य झाल्यास घरीच किंवा मंदिरात जाऊन ‘ॐ नमः शिवाय’ या मंत्राचा जप करणे फायदेशीर मानले जाते, यावेळी मनातील विचार बाजूला ठेवण्याचा सल्ला दिला जातो. मानसिक ताण तणाव कमी होण्यास मदत होते.
शनिने चंद्र ग्रहणासह साधला ‘विष योग’; ‘या’ ३ राशींनी धन व तन जपावे, मित्राच्या रूपातच येतील…
(टीप- वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे, यातून अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही)
