Shani Sadesati on Zodiac Signs: शनीदेव २८ नोव्हेंबर २०२५ रोजी मीन राशीत मार्गी होतील. शनीला न्याय आणि कर्माचा देव मानतात. सध्या शनी मीन राशीत आहेत. शनी एका राशीत साधारण अडीच वर्षे राहतात, त्यामुळे पुढच्या वर्षीही शनी मीन राशीत राहतील.

या वर्षी शनी वक्री अवस्थेतून मार्गी होणार आहेत, म्हणजे शनी सरळ गतीने चालतील आणि ज्यांची साडेसाती सुरु आहे अशा राशींवर परिणाम करतील. सध्या शनी गुरुच्या नक्षत्र पूर्वा भाद्रपदमध्ये आहेत. चला तर मग पाहूया, शनीचा प्रभाव मेष, कुंभ आणि मीन राशींवर कसा पडेल.

शनीची साडेसाती सुरू असलेल्या राशीवर काय परिणाम होईल

शनीचं हे गोचर मेष, मीन आणि कुंभ राशींवर विशेष परिणाम करेल, कारण सध्या या राशींवर शनीची साडेसाती सुरु आहे.

मेष राशी (Aries Horoscope)

मेष राशीच्या लोकांना मागील काही वर्षांच्या अनुभवावरून शिकण्याची गरज आहे. तुम्हाला माहित असले पाहिजे की कोणती गोष्ट तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आर्थिक दृष्ट्या तुम्हाला सुरक्षित वाटेल. तुमचा आध्यात्माशीही संबंध राहील.

कुंभ राशी (Aquarius Horoscope)

कुंभ राशीच्या लोकांसाठी ही वेळ खूप खास आहे. ही वेळ त्यांच्या आयुष्यात बरेच बदल घडवून आणेल. तुम्हाला पद मिळेल आणि जबाबदारीही मिळेल, पुढे जाण्यासाठी हे आवश्यक आहे. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनावर विशेष लक्ष द्या. एखाद्या प्रोजेक्टवर विशेष मेहनत करावी लागेल, ज्यावर दीर्घकाळ लक्ष देणे आणि त्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. पण हा प्रोजेक्ट पुढे तुमच्या मदतीस येतील. तुमच्या आयुष्यात अडथळे येत असतील, तर त्यामागे काही कारण आहे. तुम्ही फक्त मेहनत करत राहा. शिस्तीने जीवन जगावे.

मीन राशी (Pisces Horoscope)

मीन राशीच्या लोकांनी मानसिक आरोग्यावर विशेष लक्ष द्यावे आणि सावध राहावे. शनी तुम्हाला कठीण परिस्थितींचा सामना करून मजबूत बनवत आहे. जुन्या भावनिक सवयी ज्या आधी चांगल्या वाटायच्या त्या सोडायला सुरुवात कराल.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)