Horoscope Today In Marathi, 21 May 2025 :  २१ मे हा ज्येष्ठ कृष्ण पक्षाचा नववा दिवस आणि बुधवार आहे. नवमी तिथी आज रात्री ३ वाजून २२ मिनिटांपर्यंत राहील. तर वैदृती योग आज रात्री १२ वाजून ५३ मिनिटांपर्यंत राहील. यासह शतभिषा नक्षत्र आज संध्याकाळी ६वाजून ५८ मिनिटांपर्यंत जागृत राहील. याशिवाय, आज रात्री १० वाजून १७ मिनिटांनी बुध ग्रह कृतिका नक्षत्रात प्रवेश करेल. आजच्या शतभिषा नक्षत्रात कोणत्या राशींवर होईल धनवर्षाव अन् कोणत्या राशींचे नशीब उजळणार जाणून घेऊ…

२१ मे २०२५ पंचांग व राशिभविष्य (Daily Horoscope in Marathi, 21 May 2025)

मेष राशिभविष्य (Aries Horoscope Today in Marathi) 

रेस जुगारातून लाभ संभवतो. शक्यतो प्रवास टाळावा. कौटुंबिक जबाबदारी उत्तमरीत्या पेलाल. घरासाठी मोठ्या वस्तु खरेदी केल्या जातील. घेतलेल्या कष्टाचे चीज होईल.

वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope Today in Marathi)

आपला नावलौकिक लक्षात घेऊन वागावे. काहीसा मानसिक ताण संभवतो. दिवसभर कामाचा व्याप राहील. स्वत:चेच म्हणणे खरे करायला जाल. कौटुंबिक खर्चात वाढ होईल.

मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope Today in Marathi)

प्रवासात काहीसा त्रास संभवतो. तुमच्या मानाला धक्का लागण्याची शक्यता आहे. गरज पडल्यास दोन पावले मागे यावे. स्त्री सौख्याचा लाभ होईल. आपले मत योग्य प्रकारे मांडा.

कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope Today in Marathi)

आवडते पदार्थ खायला मिळतील. महत्त्वाची कागदपत्रे सांभाळून ठेवा. घराबाहेर वावरतांना सतर्क रहा. मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी. बाहेरील अन्नपदार्थ टाळावेत.

सिंह राशिभविष्य (Leo Horoscope Today in Marathi)

तुमच्या व्यक्तिमत्वावर लोक खुश होतील. मित्र मंडळींचा गोतावळा जमवाल. पत्नीशी वादाचे प्रसंग येवू शकतात. हाताखालील लोकांकडून कामे व्यवस्थित पूर्ण करून घ्याल. विरोधकांचा विरोध मावळेल.

कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope Today in Marathi)

कामाचे योग्य नियोजन करावे. दिरंगाईवर मात करावी लागेल. वरिष्ठांचा आदेश वेळेवर पूर्ण करा. मानसिक स्थैर्य जपावे. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल.

तूळ राशिभविष्य (Libra Horoscope Today in Marathi)

मनातील जुनी इच्छा पूर्ण होईल. काही कामात अधिक कष्ट घ्यावे लागतील. वेळ आणि काम यांची सांगड घाला. मुलांचे वागणे स्वातंत्र्यप्रिय राहील. क्रोधावर नियंत्रण ठेवावे.

वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope Today in Marathi)

तुमचे श्रम वाढू शकतात. पत्नीशी मतभेदाची शक्यता आहे. जुनी प्रकरणे सामोरी येवू शकतात. व्यावसायिक स्थैर्य लाभेल. प्रवासात सावधानता बाळगावी.

धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope Today in Marathi)

कामानिमित्त घरापासून दूर जावे लागेल. संसर्गजन्य विकारांपासून जपावे. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. उपासनेला वेळ मिळेल. गुरूजनांच्या आशीर्वादाचा लाभ मिळेल.

मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope Today in Marathi)

योग्य वेळी केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. कामे कमी श्रमात पार पडतील. चुकीच्या मार्गाचा अवलंब करू नका. नैराश्याला बळी पडू नका. बोलतांना इतरांचे मन दुखवू नका.

कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope Today in Marathi)

भागीदारीतील प्रश्न सामोपचाराने सोडवाल. चैनीच्या वस्तूंकडे ओढ वाढेल. धार्मिक कामात सहभाग घ्याल. घरातील टापटि‍पी बाबत आग्रही राहाल. मुलांच्या खोडकरपणात वाढ होईल.

मीन राशिभविष्य (Pisces Horoscope Today in Marathi)

इतरांच्या वागण्याचा फार विचार करू नका. कफ विकाराचा त्रास संभवतो. हाताखालील लोकांचे उत्तम सहकार्य मिळेल. कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल. निसर्ग सौंदर्यात रमून जाल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर