Shukra-Chandra Gochar 2025: ज्योतिषशास्त्रामध्ये ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन केले जाते ज्याचा शुभ-अशुभ प्रभाव मानवी जीवनावर पाहायला मिळतो. नुकताच ऑगस्ट महिना सुरू झाला असून या महिन्यात ग्रहांचा राशी परिवर्तनासह ग्रहांचे नक्षत्र परिवर्तनही होईल. मनाचा कारक ग्रह चंद्र आणि भौतिक सुखाचा कारक ग्रह शुक्र या महिन्यात नक्षत्र परिवर्तन करतील. ज्याचा शुभ प्रभाव १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल.

पंचांगानुसार, १ ऑगस्ट २०२५ रोजी चंद्र सकाळी १२ वाजून ४१ मिनिटांनी स्वाती नक्षत्रामध्ये प्रवेश केला असून शुक्र ग्रहाने ३ वाजून ५१ मिनिटांनी आर्द्रा नक्षत्रात प्रवेश केला. ग्रहांचे हे नक्षत्र परिवर्तन काही राशीच्या व्यक्तींसाठी फायदेशीर असेल.

‘या’ तीन राशींचे नशीब चमकणार

मेष (Mesh Rashi)

मेष राशीच्या व्यक्तींसाठी चंद्र-शुक्राचे नक्षत्र परिवर्तन खूप शुभ परिणाम देणारा असेल. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा. या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील.

तूळ (Tula Rashi)

शुक्र-चंद्राचे नक्षत्र परिवर्तन तूळ राशीच्या व्यक्तींसाठी अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा. सगळीकडे चुमचे वर्चस्व असेल. फक्त मेहनत कायम ठेवा. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार कराल.

वृश्चिक (Vruschik Rashi)

वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी शुक्र-चंद्राचे नक्षत्र परिवर्तन अनुकूल ठरेल. हा काळ अनेक आनंदी वार्ता घेऊन येईल. करिअर, व्यवसायात चांगली प्रगती होईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. भाग्याची भरपूर साथ मिळेल. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे फळ लाभेल. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)