Shukra Gochar 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र हा धन, वैभव, प्रेम, विलास, ऐश्वर्य, वैवाहिक सुख यांचा कारक मानला जातो. शुक्र जेव्हा जेव्हा राशी किंवा नक्षत्र बदल करतो, तेव्हा तेव्हा अनेक क्षेत्रांवर विशेष प्रभाव दिसून येतो. जुलैमध्ये शुक्र तीनदा आपली चाल बदलणार आहे, ज्यामध्ये तो प्रथम ८ जुलै रोजी रोहिणी नक्षत्रात प्रवेश करेल आणि २० जुलैपर्यंत त्या नक्षत्रात स्थिर राहील. पण, २० जुलै २०२५ पासून शुक्र रोहिणी नक्षत्रातून मृगशिरा नक्षत्रात प्रवेश करेल.
तर महिन्याच्या अखेरीस म्हणजे २६ जुलै २०२५ रोजी शुक्र मिथुन राशीत गोचर करेल. अशाप्रकारे शुक्र तीन वेळा चाल परिवर्तन करेल, ज्यामुळे काही राशींचे भाग्य चमकू शकते. तसेच त्यांना करिअर आणि व्यवसायात प्रगती साधता येऊ शकते, पण नेमकं कोणत्या राशींना याचा फायदा होईल जाणून घेऊ…
तूळ
तूळ राशीच्या लोकांसाठी शुक्राचा नक्षत्र बदल शुभ ठरू शकतो. या काळात तुळ राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळू शकते. आर्थिक दृष्टिकोनातून जुलै महिना व्यावसायिक आणि नोकरदार लोकांच्या हिताचा असेल. तुम्हाला देशांतर्गत आणि परदेशात प्रवासाची संधी मिळेल. तसेच नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी कनिष्ठ आणि वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. या काळात तुमचा धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमांमध्ये सहभाग वाढू शकतो.
सिंह
शुक्राची चाल बदल सिंह राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. या काळात तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. आर्थिक गुंतवणुकीतून तुम्हाला नफा होऊ शकतो. तुमची प्रतिभा आणि उत्पादकता वाढेल. तुम्हाला तुमची एक वेगळी ओळख निर्माण करता येईल. यावेळी वैवाहिक जीवन आणि लव्ह लाईफमध्ये चांगले दिवस येतील. तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतात.
धनु
शुक्राच्या हालचालीत होणारा बदल धनु राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकतो. या काळात विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन उत्तम राहील. ???तसेच विवाहितांचे नातेसंबंधातील अडचणी संपूर्ण नाती सुधारतील.??? जुन्या गुंतवणुकीतून अचानक नफा मिळून आर्थिक संकट दूर होईल. जनसंवाद, पत्रकारिता, नाट्य किंवा अभिनय शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला आहे. त्याच वेळी पार्टनरशिपच्या कामातून नफा होऊ शकतो. अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात.