Shukra Transit In Tula : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार सर्वच ग्रह हे वेळोवेळी गोचर करत असतात. याचा थेट प्रभाव हा मानवी जीवनावर दिसून येतो. यातील काही ग्रहांचे संक्रमण अधिक बलवान असते तर काहींचा प्रभाव अगदीच नगण्य असतो. यावेळेस २ नोव्हेंबर रोजी बलवान अशा शुक्राचे गोचर होणार आहे. शुक्र देव दिवाळी नंतर तूळ राशीत संक्रमण करणार आहेत. विशेष म्हणजे तूळ ही शुक्राची मूळ त्रिकोण रास आहे. शुक्र गोचरामुळे सर्वच राशींवर प्रभाव पडणार असला तरीही या ३ राशी आहेत; ज्यांच्यासाठी हे मार्गक्रमण अत्यंत शुभ व लाभदायक ठरू शकते.

जेव्हा संपत्ती, समृद्धी आणि विलासाचा ग्रह शुक्र, स्वतःच्या राशीत, तूळ राशीत संक्रमण करतो तेव्हा ‘मालव्य राजयोग’ तयार होतो. हा राजयोग पाच महापुरुष राजयोगांपैकी एक आहे; जो ज्योतिषशास्त्रात अत्यंत शुभ योग मानला जातो. २ नोव्हेंबर २०२५ रोजी शुक्र तूळ राशीत संक्रमण करणार आहे. तूळ राशीतील संक्रमणामुळे मालव्य राजयोग निर्माण होईल; जो २६ नोव्हेंबरपर्यंत राहील. या काळात, असे योग निर्माण होतील ज्यामुळे तीन राशींना नवीन नोकऱ्या, संपत्ती मिळेल. २०२५ च्या अखेरीस या व्यक्तींना महत्त्वपूर्ण लाभ होतील. या भाग्यवान राशी कोणत्या आहेत ते जाणून घ्या.

तूळ – तूळ राशीच्या लोकांना मालव्य राजयोगाचा सर्वाधिक फायदा होईल. कारण शुक्र याच राशीतून संक्रमण करणार आहे; ज्यामुळे राजयोग निर्माण होतो. हे संक्रमण तुमच्या व्यक्तिमत्त्वात सुधारणा करेल, संपत्ती आणेल आणि नवीन नोकरी देऊन जाईल. नातेसंबंध दृढ होऊ शकतात आणि भागीदारीत असलेल्यांना फायदा सुद्धा होऊ शकतो.

मकर – या राजयोगामुळे मकर राशी असलेल्यांनाही महत्त्वपूर्ण फायदे होतील. कामात पदोन्नती, उच्च पद मिळण्याची शक्यता दिसते आहे. व्यवसायातही भरभराट होईल. अचानक आर्थिक लाभ, वेळोवेळी तुमची प्रशंसा होईलआणि तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव वाढेल. त्यामुळे तुम्ही जीवनाचा पुरेपूर आनंद घेऊ शकणार आहात.

धनु – मालव्य राजयोग जुळून आल्यामुळे , धनु राशीच्या लोकांना लक्षणीय लाभ होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत उदयास येतील आणि गुंतवणुकीतून नफा मिळेल. त्यांना अचानक पैसे मिळतील, शेअर्समधून नफा होईल. पैसे अडकले आहेत ते परत मिळवू शकतात. त्याचबरोबर चांगली बातमी मिळण्याचीही शक्यता आहे.