Surya Chandra Yuti after Diwali: ज्योतिषानुसार, दिवाळीच्या आधी आणि नंतरच्या काळात ३ राशींना जास्त फायदा होणार आहे कारण सूर्य आणि चंद्र यांची युती लवकरच होणार आहे. या वर्षी २०२५ मध्ये दिवाळी २० ऑक्टोबरला आहे.

१७ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ०१:५३ वाजता सूर्य तूळ राशीत प्रवेश करेल. नंतर २१ ऑक्टोबर सकाळी ०९:३५ वाजता चंद्र देखील तूळ राशीत येईल. २३ ऑक्टोबर रात्रीपर्यंत चंद्र तूळ राशीत राहील.

सूर्य आणि चंद्राची युती

सूर्य आणि चंद्र यांची युती झाल्यामुळे तीन राशींच्या लोकांना अनेक फायदा होणार आहे. मानसिक शांतता, सुखात वाढ आणि व्यक्तिमत्वात सुधारणा होईल. मान-सन्मान आणि यश दूरपर्यंत पोहचेल.

कर्क राशी (Cancer Horoscope)

कर्क राशीच्या लोकांना सूर्य-चंद्र युतीमुळे विशेष फायदा होणार आहे. खूप दिवसांपासून असलेली मानसिक त्रास कमी होईल. या राशीचे लोक त्यांच्या शत्रूंवर विजय मिळवतील. जमीन किंवा घरा सारखी स्थिर मालमत्ता खरेदी करण्याची संधी मिळेल. आर्थिक फायदा होईल. अडकलेले काम पूर्ण करण्याची संधी मिळू शकते. जीवनसाथी सोबत वेळ चांगला जाईल.

सिंह राशी (Leo Horoscope)

सिंह राशीच्या लोकांना दिवाळीच्या काळात सूर्य आणि चंद्र युतीमुळे अनेक फायदे होऊ शकतात. जवळच्या लोकांची साथ मिळेल. अचानक एखाद्या जुन्या मित्रांकडून पैसे मिळू शकतात. आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी अनेक संधी मिळतील. घराबाहेर जाताना मोठ्यांचे आशीर्वाद घेणे शुभ ठरेल. या राशीचे लोक मानसिक शांतता अनुभवतील.

तूळ राशी (Libra Horoscope)

तूळ राशीच्या लोकांना सूर्य-चंद्र युतीमुळे शुभ परिणाम होतील. नोकरी करणाऱ्यांना ऑफिसमध्ये नवीन जबाबदारी मिळू शकते. कुटुंबासोबत वेळ चांगला जाईल. कामाच्या ठिकाणी आत्मविश्वास वाढेल. भीती आणि दुःख संपतील. वडिलांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. व्यवसायात अनपेक्षित फायदा होऊ शकतो.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)