Surya Grahan Bad Impact to Zodiac Signs: वैदिक पंचांगानुसार यावर्षाचं दुसरं आणि शेवटचं सूर्यग्रहण २१ सप्टेंबर २०२५ रविवारी लागणार आहे. सगळ्यात खास गोष्ट अशी की या दिवशी सर्वपितृ अमावस्या आहे आणि याचदिवशी पितृपक्ष संपणार आहे. अशातच यादिवशी लागणारं सूर्यग्रहण ज्योतिषशास्त्रानुसार महत्त्वाचे मानलं जाणार आहे.
ज्योतिषांच्या मते हे ग्रहण आंशिक सूर्यग्रहण असेल आणि भारतात दिसणार नाही. त्यामुळे त्याचा सूतक काळही लागू होणार नाही. हे सूर्यग्रहण कन्या राशीत होणार आहे. त्यामुळे काही राशींवर त्याचे अशुभ परिणाम दिसू शकतात. चला तर जाणून घेऊया त्या कोणत्या राशी आहेत…
कन्या राशी (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या लोकांना या काळात जास्त सावध राहण्याचा सल्ला दिला जात आहे. ज्योतिषानुसार या काळात अचानक आर्थिक नुकसान होऊ शकते. गुंतवणुकीत तोटा होण्याची शक्यता आहे, त्यामुळे पैसे उधार देणे-घेणे टाळा. व्यवसायात मोठे व्यवहार करू नका. नोकरीत ताण वाढू शकतो. वैयक्तिक जीवनात वाद होऊ शकतो. घरचे वातावरण अस्थिर राहू शकते. या काळात कोणताही मोठा निर्णय घेणे टाळा.
वृश्चिक राशी (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हे ग्रहण आर्थिक बाबतीत कठीण ठरू शकते. खर्च अचानक वाढू शकतात. पैशांबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी नीट विचार करा. घाईत घेतलेला निर्णय मोठा तोटा देऊ शकतो. मनावर ताण येऊ शकतो आणि थकवा जाणवू शकतो. त्यामुळे स्वतःला शांत ठेवा आणि ध्यान करा.
मकर राशी (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी वर्षातील हे शेवटचे ग्रहण शुभ नाही. या काळात कामाचा ताण वाढू शकतो. व्यापाऱ्यांना काही अडचणी येऊ शकतात. कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी नीट विचार करा. चुकीचा निर्णय घेतल्यास कामकाज बिघडू शकते. जीवनसाथीसोबत वाद होऊ शकतो.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)