Shravan 2022: श्रावणाचा पवित्र महिना लवकरच सुरू होतोय; जाणून घ्या उपवासाच्या खास टिप्स| Shravan 2022: The holy month of Shravan is starting soon; Know special fasting tips | Loksatta

Shravan 2022: श्रावणाचा पवित्र महिना लवकरच सुरू होतोय; जाणून घ्या उपवासाच्या खास टिप्स

श्रावणच्या पवित्र महिन्यात उपवासाचे देखील नियम सांगितले आहेत जे आपण पाळले पाहिजे. तर जाणून घेऊया श्रावण महिन्यात उपवासाचे नियम.

Shravan 2022: श्रावणाचा पवित्र महिना लवकरच सुरू होतोय; जाणून घ्या उपवासाच्या खास टिप्स
श्रावण महिन्यातील खायचे पदार्थ( फोटो: प्रातिनिधिक)

Shravan 2022 Maharashtra: श्रावणाचा पवित्र महिना २९ जुलैपासून सुरू होत आहे. हिंदू धर्मात या पवित्र महिन्याला विशेष असं स्थान आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार, सावन हा आषाढ महिन्यानंतर येणारा पाचवा महिना आहे आणि तो भगवान शिवाला समर्पित आहे. या महिन्यात भक्त दर सोमवारी उपवास करतात आणि भगवान शंकराला बेल पत्र, गाईचे दूध, धतुरा, भांग आणि चंदन अर्पण करतात. यावर्षीचा पहिला श्रावण सोमवार व्रत २९ जुलै रोजी होणार असून पवित्र महिना २३ ऑगस्ट रोजी संपणार आहे. या महिन्यात अनेकजणांचे उपवास असतात. तर या पवित्र महिन्यात उपवासाचे देखील नियम सांगितले आहेत जे आपण पाळले पाहिजे. तर जाणून घेऊया श्रावण महिन्यात उपवासाचे नियम.

पवित्र महिन्यात उपवासाचे कोणते नियम पाळले पाहिजेत?

१) व्रत प्रामाणिकपणे पाळले पाहिजे आणि विधींचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे.
२) महिन्याच्या प्रत्येक सोमवारी लवकर उठणे, स्नान करणे, घर स्वच्छ करणे आणि गंगाजल शिंपडणे आवश्यक आहे.
३) घराच्या ईशान्य दिशेला भगवान शिवाची मूर्ती किंवा चित्र ठेवावे, तसंच त्यांना बाल पत्र, चंदन, धतुरा, भांग आणि कच्चे गाईचे दूध अर्पण करावे. पूजा विधी झाल्यानंतर आरती करावी.
४) उपवास करताना, स्वतःला उपाशी ठेवू नका. दर दोन तासांनी सुके मेवे आणि फळे खात राहा.
५) सावन महिन्याच्या पवित्र महिन्यात, सोमवारी उपवास करताना, उपवासाच्या आहारात नट्स, फळे, दूध आणि लोणी यांसारखे दुग्धजन्य पदार्थ तसंच राजगिराचे पीठ समाविष्ट करा.
६) शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी दिवसभर पाणी, दूध, ताक आणि ताजे ज्यूस प्या.
७) पवित्र महिन्यात स्वयंपाकाच्या पाककृतींसाठी टेबल मिठाच्या जागी रॉक सॉल्ट किंवा सेंधा नमक घाला. तसेच, मसाले वापरताना जिरे, दालचिनी, हिरवी वेलची, लवंगा वापरण्यापेक्षा काळी मिरी पावडर, तिखट आणि काळी मिरी पूडचा वापर करा.

( हे ही वाचा: पावसात भिजणे आरोग्यासाठी आहे फायदेशीर; मिळतील आश्चर्यकारक फायदे)

या चूका करू नका

१) भगवान शिवाची पूजा करताना केतकीचे फूल आणि हळद वापरण्यास मनाई आहे.
२) तज्ज्ञांच्या मते, पवित्र महिन्यात कांदा, लसूण आणि मसाल्यांचे सेवन टाळावे. तसेच, मोहरीचे तेल, मसूर डाळ, वांगी आणि तिळाचे तेल यांसारखे इतर पदार्थ आणि तेल टाळावे.
३) याशिवाय, मांस, अंडी, मद्य आणि तंबाखूचे सेवन देखील श्रावण महिन्यात करण्यास सक्त मनाई आहे.
४) आणि जर तुम्ही सोमवारी उपवास करत असाल तर संध्याकाळी आरती किंवा सूर्यास्तापूर्वी योग्य पूर्ण जेवण किंवा शेवटचे जेवण करू नका.
५) पॅक केलेले रस पिणे टाळा कारण त्यात चव वाढवण्यासाठी मीठ घालू शकतात.

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
गरिबी दूर करण्यासाठी देवी लक्ष्मीच्या ‘या’ मंत्रांचा करा जप; कधीही भासणार नाही आर्थिक समस्या

संबंधित बातम्या

३० महिन्यांनी शनिदेवाचा कुंभ राशीत प्रवेश; २०२३ मध्ये ‘या’ ३ राशींना प्रचंड पैसा मिळण्याची संधी
स्वयंपाकघरात असलेल्या ‘या’ ४ आयुर्वेदिक गोष्टींमुळे मधुमेह सुरू होण्यापूर्वीच थांबतो, रक्तातील साखरही वाढत नाही!
५ रुपयांचा कापूर तुमचे जीवनच बदलून टाकेल? काही लोकांनाच माहित आहेत याचे चमत्कारिक फायदे
शनिदेव डिसेंबर महिन्यात ‘या’ राशींना बनवतील श्रीमंत? २०२२ च्या शेवटच्या महिन्यात होणार अपार धनलाभ
२०२३ मध्ये ‘या’ राशींना राहू बनवणार श्रीमंत? नवीन वर्षात मिळेल प्रचंड धनलाभाची संधी

व्हिडिओ

ताज्या बातम्या
पुणे: गोवरची साथ नियंत्रणासाठी चौथीपर्यंतच्या वर्गांना सुटी द्या; छावा मराठा संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
शहरी नक्षलवाद प्रकरण : हानी बाबू यांची अंतरिम वैद्यकीय जामिनासाठी याचिका
‘माझी स्पर्धक मीच’ – अभिनेत्री संयमी खेर
गडकरींनी गुजरात विजयासाठी मोदींना दिलं श्रेय, तर हिमाचलमध्ये सत्ता गेल्याने नशीबाला दिला दोष; कारण विचारलं तर म्हणाले “शेवटी…”
‘समृद्धी’चं उद्घाटन करताना मोदी आम्हालाही टोमणे मारतील, पण…”, उद्धव ठाकरेंचा खोचक टोला!