28th March 2024 Marathi Panchang & Rashi Bhavishya: २८ मार्च २०२४ ला फाल्गुन कृष्ण पक्षातील तृतीया व चतुर्थी तिथी एकत्रच आहे. आजच्या दिवशी मार्च महिन्यातील पहिली संकष्टी चतुर्थी असणार आहे. आजच्या तिथीला स्वाती नक्षत्रात हर्षण योगातील शुभ दिवस असणार आहे. आज दुपारी १२ वाजून २ मिनिटांपासून ते १२ वाजून ५० मिनिटांपर्यंत अभिजात मुहूर्त असणार आहे. आज १ वाजून ५८ मिनिटांपासून ते ३ वाजून ३१ मिनिटांपर्यंत राहुकाळ असणार आहे. आज चंद्र तूळ राशीत असणार आहे व रात्री ९ वाजून २७ मिनिटांनी चंद्रोदय असणार आहे. आजच्या दिवशी कोणत्या राशीचे नशीब फळफळणार हे पाहूया..

संकष्टी चतुर्थी विशेष पंचांग व राशी भविष्य

मेष:-एकाच कामात अधिक लक्ष द्यावे. हाताखालील लोकांचे सहकार्य मिळेल. मनाची द्विधावस्था वाढू शकते. संयम बाळगावा लागेल. आवडत्या गोष्टीत मन रमवा.

shares market, stock prices
तेजीला पूर्णविराम की स्वल्पविराम?
Shukra Gochar 2024
Shukra Gochar 2024 : पौर्णिमेच्या दिवशी शुक्र गोचर पालटणार नशीब, ‘या’ राशींच्या लोकांना मिळणार बक्कळ पैसा
11th April 2024 Panchang Guruvaar Marathi Rashi Bhavishya
११ एप्रिल, गुरुवार पंचांग: आज आयुष्यमान, सौभाग्य योग; तुमच्या राशीच्या कुंडलीत आज कोणत्या रूपात लाभेल गौरी कृपा?
surya grahan 2024 negative impact of solar eclipse on these three zodiac sign read more
५४ वर्षांनंतर सूर्यग्रहणात तयार होणार दुर्मीळ योग, ‘या’ तीन राशींच्या अडचणी वाढणार?

वृषभ:-मितभाषी दृष्टीकोनातून वागाल. मनापेक्षा बुद्धीचा अधिक वापर कराल. फार संभ्रमात अडकू नका. सर्वांना आनंद वाटण्याचा प्रयत्न कराल. तुमच्या स्वभावाची उत्तम छाप पडेल.

मिथुन:-घरगुती कामात मन रमवाल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. योग्य संधीची वाट पहावी लागेल. घरात नीटनेटकेपणा ठेवाल. कामे उगाचच खोळंबून राहतील.

कर्क:-मौजमजेकडे अधिक कल राहील. सारासार विचार करण्यावर भर द्यावा. स्त्री सौख्यात वाढ होईल. जवळच्या मित्रांचा सहवास लाभेल. जोडीदाराविषयी मनात गैरसमज निर्माण होऊ शकतो.

सिंह:-नोकरीच्या ठिकाणी कामाचा व्याप वाढू शकतो. वरिष्ठांना नाराज करून चालणार नाही. प्रवासात योग्य खबरदारी घ्यावी. पैशाचा अपव्यय टाळावा. जोडीदाराचा सल्ला विचारात घ्यावा.

कन्या:-एकाच वेळी अनेक कामे अंगावर येऊ शकतात. कामातील तांत्रिक बाजू जाणून घ्यावी. मुलांचा खोडकरपणा वाढेल. उगाचच निरूत्साही वाटेल. आळस झटकून टाकावा.

तूळ:-मानसिक गोंधळ दूर सारावा. फार काळजी करत बसू नका. लेखक वर्गाला चांगला लाभ मिळेल. बौद्धिक डावपेच खेळाल. सूचक स्वप्न पडू शकेल.

वृश्चिक:-संभाषणाची आवड जोपासाल. घरी नातेवाईक गोळा होतील. तुमच्यातील प्रेमळपणा दिसून येईल. नवीन मित्र जोडले जातील. प्रवासात खर्च वाढू शकतो.

धनू:-कौटुंबिक गोष्टींचे भान राखावे. लेखक, प्रकाशक यांना चांगला लाभ होईल. लहान प्रवासाचा योग येईल. सर्व बाबी औत्सुक्याने जाणून घ्याल. काही गोष्टींचे मनन करावे.

मकर:-प्रकृतीची काळजी घ्यावी. अनाठायी खर्च करू नका. कौटुंबिक परिस्थिती संयमाने हाताळावी. क्षुल्लक गोष्टी मनावर घेऊ नयेत. हातातील कामात अधिक लक्ष घालावे.

कुंभ:-चौकसपणे गोष्टी समजून घ्याल. स्मरणशक्तीचा चांगला उपयोग कराल. भावना उत्तम प्रकारे मांडाल. घरगुती जबाबदारी वाढेल. कामाचे योग्य नियोजन करावे.

हे ही वाचा<< येत्या १७ दिवसात ‘या’ ३ राशींच्या कुंडलीत सूर्याची किरणं दाखवतील श्रीमंतीचा मार्ग; गुढीपाडव्यानंतर बदलणार नशीब

मीन:-काहीसा थकवा जाणवेल. रहस्यमय गोष्टी जाणून घ्याल. व्यापारी वर्गाला चांगला लाभ संभवतो. तुमची महत्त्वाकांक्षा वाढीस लागेल. मुलांकडे बारीक लक्ष ठेवावे लागेल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर