ज्योतिष शास्त्रानुसार सप्टेंबर महिन्यात ५ ग्रहांच्या चालीमध्ये बदल होणार आहेत. ज्याचा परिणाम मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर दिसू शकतो. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला गुरू मेष राशीत वक्री होईल. तर ४ सप्टेंबर रोजी शुक्र कर्क राशीत मार्गी होणार आहे. त्यानंतर १६ सप्टेंबर रोजी बुध सिंह राशीत मार्गी होईल तर १७ सप्टेंबरला सूर्य कन्या राशीत गोचर करणार आहे. यानंतर सगळ्यात शेवटी मंगळ कन्या राशीत अस्त होणार आहे. अशा स्थितीत या ग्रहांच्या चालीतील बदलामुळे ३ राशीच्या लोकांच्या मनोकामना पूर्ण होण्याची शक्यता आहे. तसेच त्यांची करिअर आणि व्यवसायात प्रगती होण्याची दाट शक्यता आहे. तर या ३ भाग्यशाली राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.
मेष रास (Aries Zodiac)
मेष राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर महिना फायदेशीर ठरू शकतो. कारण या महिन्यात तुमच्या राशीवर गुरु राहूची स्थिती आणि मंगळाची दृष्टी शुभ आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला सन्मान आणि प्रतिष्ठा मिळू शकते. तसेच, तुम्हाला प्रेम जीवनात यश मिळू शकते. प्रेमप्रकरणाचे रुपांतर लग्नात होऊ शकते. दुसरीकडे, जे विवाहित आहेत, त्यांचे वैवाहिक जीवन आनंदी राहू शकते. मात्र या काळात रागावर थोडे नियंत्रण ठेवा.
वृषभ रास (Taurus Zodiac)
वृषभ राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर महिना अनुकूल ठरू शकतो. या काळात तुमची रखडलेले कामे या महिन्यात पूर्ण होऊ शकतात. तसेच, तुमचे अडकलेले पैसेही मिळू शकतात. या काळात तुम्ही केलेल्या नियोजनात यश मिळू शकते. त्याचबरोबर तुमची आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. तसेच उत्पन्नाच्या नवीन स्रोतांमधून पैसे मिळवण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता. तर तुम्ही या महिन्यात वाहन आणि मालमत्ता खरेदी करू शकता. या महिन्यात तुम्हाला मुलांशी संबंधित काही बातमी मिळू शकते.
तूळ रास (Tula Zodiac)
तूळ राशींच्या लोकांसाठी सप्टेंबर महिना फायदेशीर ठरू शकतो. नोकरदारांना या महिन्यात नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात. तसेच यावेळी तुम्हाला कोर्ट केसेसमध्ये विजय मिळू शकतो. या महिन्यात तुम्ही काम-व्यवसायाच्या संदर्भात प्रवास करू शकता, जो तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकतो.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)