Daliy Horoscope Live Updates:वैदिक ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाला विशेष महत्व आहे. हे ग्रह एका ठरावीक कालावधीनंतर राशी किंवा नक्षत्र बदल करत असतात. ज्याचा परिणाम प्रत्येक राशींच्या लोकांच्या जीवनावर दिसून येतो. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राश आहेत, या बारा राशींपैकी काही राशींवर ग्रह, नक्षत्र गोचर आणि ग्रहांच्या संयोगाने निर्माण होणाऱ्या राजयोगाचा सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव पडत असतो. अंकशास्त्रात व्यक्तीच्या जन्मतारखेवरुन त्याचा मूल्यांक शोधला जातो आणि त्यानुसार व्यक्तीचे स्वभाव आणि भविष्याविषयी अंदाज बांधला जातो. याशिवाय चाणक्य नितीच्या माध्यमातूनही व्यक्तीला समाजात वावरताना कोणत्या निती नियमांचे पालन केले पाहिजे याविषयीची माहिती दिली जाते. दरम्यान आजचा दिवस १२ राशींसाठी नेमका कसा जाईल जाणून घेऊ…
Today Horoscope 23 May 2025: आजचे राशिभविष्य लाईव्ह २३ मे २०२५
जूनमध्ये ग्रहांचा मोठा उलटफेर! ५ राशींच्या लोकांचे नशीब अचानक पलटणार! व्यवसायात मिळेल यश
Chanakya Niti: पुरुषांनो, महिलांच्या कोणत्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नये माहितीये? चाणक्य म्हणतात...
४८ तासांनी सूर्यदेव 'या' राशींना देणार चटके? सूर्याचे चंद्राच्या नक्षत्रात प्रवेश वाढवणार चिंता? मोठं नुकसान होण्याची शक्यता
मीन राशिभविष्य (Pisces Horoscope Today in Marathi)
सामाजिक वादात अडकू नका. वडीलधार्यांची कौतुकाची थाप पाठीवर पडेल. निसर्ग सौंदर्याची ओढ वाढीस लागेल. इतरांच्या मदतीला धावून जाल. जोडीदाराचे प्रेमळ सौख्य लाभेल.
कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope Today in Marathi)
आपले उद्दीष्ट सध्या करण्याचा प्रयत्न करावा. खाण्यापिण्याची पथ्य पाळावीत. डोकेदुखीचा त्रास जाणवेल. स्वत:चेच म्हणणे खरे कराल. साहसी निर्णय विचारांती घ्यावेत.
मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope Today in Marathi)
कामातील चिकाटी वाढवावी. उतावीळपणे कोणतेही निर्णय घेऊ नयेत. चुकून बोललेला शब्द लागू शकतो. स्वभावात काहीसा लहरीपणा येईल. इतरांना आनंदाने मदत कराल.
धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope Today in Marathi)
कामे यथायोग्य पार पडतील. खर्चाचा योग्य आकडा निश्चित करावा. टीकेला सामोरे जावे लागू शकते. हट्ट सोडावा लागू शकतो. भावंडांच्या प्रकृतीकडे लक्ष द्या.
वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope Today in Marathi)
जोडीदाराच्या मताला मान्यता द्याल. तुमच्यातील आशावाद वाढीस लागेल. घरात प्रभुत्व गाजवण्याचा प्रयत्न कराल. कामात प्रगतीला वाव आहे. व्यवसायातून चांगला आर्थिक लाभ होईल.
तूळ राशिभविष्य (Libra Horoscope Today in Marathi)
वादाच्या दोन्ही बाजू विचारात घ्याव्यात. एखाद्या इच्छेला मुरड घालावी लागू शकते. पत्नीचा निश्चय मान्य करावा लागेल. मानापमानाच्या प्रसंगातून जावे लागू शकते. क्षुल्लक कारणांवरून चिडू नये.
कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope Today in Marathi)
इतरांवर आपली उत्तम छाप पाडाल. तब्येतीत सुधारणा दिसून येईल. फक्त कामावरच लक्ष केन्द्रित करावे. मनाची चंचलता जाणवेल. वडीलधार्यांचा सल्ला विचारात घ्यावा.
सिंह राशिभविष्य (Leo Horoscope Today in Marathi)
कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील. कामात हाताखालील सहकार्यांची मदत होईल. लहान मुलांत रमून जाल. नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न कराल. व्यापारी वर्गाला चांगला लाभ होईल.
कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope Today in Marathi)
जोडीदाराची उत्तम साथ राहील. मनातील सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण होतील. घराबाहेर वावरतांना मौल्यवान वस्तु सांभाळाव्यात. फसवणुकीपासून सावध राहावे. जवळच्या ठिकाणाला भेट द्याल.
वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope Today in Marathi)
व्यावहारिक बुद्धिमत्ता दाखवाल. तुमचा तर्क अचूक लागेल. आपले मत गोडीने समजावून सांगाल. कामाचा व्याप वाढेल. अती श्रमाचा ताण राहील.
मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope Today in Marathi)
हसतहसत कामे साधून घ्याल. तत्परतेने कामे पूर्ण करण्यावर भर द्यावा. खोट्या गोष्टींचा आधार घेणे टाळा. आपले विचार मोजक्या शब्दात मांडा. झोपेची तक्रार जाणवेल.
मेष राशिभविष्य (Aries Horoscope Today in Marathi)
परिस्थितीला नावे ठेऊ नका. आपल्या मानसिक अस्वास्थ्याचे कारण शोधा. एकाच गोष्टीवर अडकून राहू नका. आपल्या आवडत्या कामात मन गुंतवा. मित्रांशी मतभेद संभवतात
सूर्य-वरुणने निर्माण केला शक्तिशाली राजयोग! 'या' राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, झटपट वाढणार बँक बॅलन्स
Chanakya Niti: पुरुषांनो, महिलांच्या कोणत्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नये माहितीये? चाणक्य म्हणतात…
चाणक्य नीती जीवनाच्या विविध पैलूंवर आधारित सखोल आणि व्यावहारिक ज्ञान देते. यामध्ये कुटुंब, नातेसंबंध, समाज आणि वैयक्तिक जीवनाशी संबंधित महत्त्वाच्या शिकवणींचा समावेश असतो. महिलांचा आदर करण्याची बाब जवळपास प्रत्येक धर्मात आणि संविधानात सांगितलेली आहे . आचार्य चाणक्य यांनीही त्यांच्या धोरणात स्त्रियांबद्दल तपशीलवार विवेचन केलं आहे. तसेच त्यांनी महिलांचा आदर, सन्मान आणि चारित्र्य गुणांबद्दल काही खास गोष्टी सांगितल्या आहेत. सविस्तर वाचा
मंगळ-शुक्र ‘या’ तीन राशींना देणार अपार पैसा; नवपंचम राजयोगाच्या शुभ प्रभावाने बँक बॅलन्समध्ये होणार घसघसशीत वाढ
२२ मे २०२५ रोजी दुपारी ०१ वाजून ०५ मिनिटांनी हे दोन्ही ग्रह एकत्र येऊन एकमेकांपासून १२० डिग्रीवर आले. ज्यामुळे नवपंचम राजयोग निर्माण झाला. हा राजयोग काही राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत लाभदायी सिद्ध होईल. सविस्तर वाचा
Horoscope Today : अपरा एकादशीला भगवान विष्णु मेष ते मीनपैकी कोणत्या राशींना पावणार, कोणाला होईल धनलाभ? वाचा राशिभविष्य
Horoscope Today In Marathi, 23 May 2025 : २३ मे ही वैशाख कृष्ण पक्षाची अपरा एकादशी आणि शुक्रवार आहे. ही अपरा एकादशी तिथी शुक्रवारी रात्री १० वाजून ३० मिनिटांपर्यंत राहील. आज प्रीती योग असून तो संध्याकाळी ६ वाजून ३६ मिनिटांपर्यंत असेल. तसेच उत्तरा भाद्रपद नक्षत्र शुक्रवारी संध्याकाळी ४ वाजून ३ मिनिटांपर्यंत जागृत असेल. सविस्तर वाचा
आजचे राशिभविष्य लाईव्ह अपडेट (Photo : Loksatta)