Dainik Rashibhavishya Updates : ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रह आणि त्यांच्या स्थितीचा अभ्यास केला जातो. हे ग्रह वेळोवेळी नक्षत्र आणि राशी बदलतात ज्याचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर आणि भविष्यावर होतो. ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे भविष्याविषयी माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आहेत. या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव होईल याचा अंदाज व्यक्त केला जातो. तसेच ज्योतिष्यशास्त्र आधारे १२ राशींचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वाविषयी अंदाज व्यक्त केला जातो.
Dainik Rashi Bhavishya live in Marathi : आजचे राशिभविष्य लाईव्ह १४ मे २०२५
आजचे मीन राशिभविष्य (Pisces Horoscope Today in Marathi)
मित्रांशी जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित करा. जवळच्या नातेवाईकांची गाठ पडेल. चांगला व्यावसायिक लाभ होईल. व्यापाराच्या नवीन योजना आखल्या जातील. निसर्ग सौंदर्याचा अनुभव घ्याल.
आजचे कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope Today in Marathi)
सर्वांना मनापासून मदत कराल. जवळचे मित्र जमवाल. दिवस गप्पा-गोष्टीत व मजेत घालवाल. कौटुंबिक जबाबदारी आनंदाने पार पाडाल. उत्तम वाहन सौख्य लाभेल.
आजचे मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope Today in Marathi)
शांत व संयमी विचारांची आवश्यकता. व्यवहारी भूमिका ठेवून वागाल. सर्वांशी सर्जनशीलतेने वागण्याचा प्रयत्न कराल. छंद जोपासण्यात वेळ घालवाल. मित्र परिवारात लाडके व्हाल.
आजचे धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope Today in Marathi)
तुमच्यातील अंगीभूत कलागुणांना वाव द्यावा. आळस झटकून कामाला लागावे. ऐषारामाच्या वस्तूंकडे ओढ वाढेल. भावंडांशी मतभेद संभवतात. कामातून आनंद व समाधान
आजचे वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope Today in Marathi)
उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. जोडीदाराबाबत आकर्षण वाढीस लागेल. कामासंबंधी नवीन योजना आखाव्यात. भागिदारीतून चांगला लाभ होईल. कौटुंबिक सुख-शांती जपावी.
आजचे तूळ राशिभविष्य (Libra Horoscope Today in Marathi)
सासुरवाडीची मदत मिळेल. सांपत्तिक दर्जा सुधारला जाईल. अचानक धनलाभ होईल. कामातून अनपेक्षित लाभ होईल. पत्नीची नाराजी दूर करावी.
Sankashti Chaturthi 2025: १५ की, १६ मे? कधी आहे ज्येष्ठ महिन्यातील पहिली चतुर्थी! जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त आणि चंद्रोदय
आजचे कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope Today in Marathi)
मानसिक गोंधळाला बळी पडू नका. कौटुंबिक गोष्टीतून मार्ग काढता येईल. मुलांचा हट्ट पुरवावा लागेल. वरिष्ठांची कौतुकाची थाप पाठीवर पडेल. परोपकाराची जाणीव ठेवाल.
आजचे सिंह राशिभविष्य (Leo Horoscope Today in Marathi)
कामानिमित्त प्रवास करावा लागेल. जोडीदाराची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करा. हाताखालील लोकांचे सहकार्य मिळेल. हितशत्रूंचा विरोध मावळेल. हातातील कामात यश येईल.
आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope Today in Marathi)
हौस मौज करण्यात खर्च वाढू शकतो. प्रत्येक गोष्टींचा उत्तम आस्वाद घ्याल. तुमच्या व्यक्तिमत्वाची इतरांवर चांगली छाप पडेल. सर्वांना लाघवीपणे आपलेसे कराल. आवडत्या कामात दिवस घालवाल.
Shukra Gochar 2025: फक्त १७ दिवस वाट पहा! शुक्र करेन मेष राशीत प्रवेश, या राशींच्या लोकांना मिळेल पैसाच पैसा
आजचे मेष राशिभविष्य (Aries Horoscope Today in Marathi)
कौटुंबिक जबाबदारी वाढेल. मोठ्या लोकांच्या ओळखीचा फायदा होईल. खर्चाचा आकडा निश्चित करा. मित्रांशी मतभेद संभवतात. जमिनीच्या कामातून लाभ मिळेल.
पैसाच पैसा; दैत्यगुरू आणि ग्रहांचा राजकुमार करणार स्वराशीत प्रवेश, 'या' तीन राशींचे जून महिन्यात नशीब फळफळणार
दोन दिवसानंतर 'या' पाच राशींसाठी उघडणार धन संपत्तीचे द्वार, शुक्राचा रेवती नक्षत्रात प्रवेश बनवणार या लोकांना श्रीमंत
चांगले दिवस दिसणार..! ३१ मे पासून 'या' राशींच्या घरात पैसाच-पैसा येणार? शुक्रदेवाच्या गोचरमुळे मेहनतीचं फळ कुणाला मिळणार?
१२ महिन्यानंतर ग्रहांचा राजकुमार बुध करणार मिथुन राशीत प्रवेश, कोणात्या राशींना मिळेल बक्कळ पैसा अन् पद-प्रतिष्ठा
१२ महिन्यानंतर ग्रहांचा राजकुमार बुध करणार मिथुन राशीत प्रवेश, कोणात्या राशींना मिळेल बक्कळ पैसा अन् पद-प्रतिष्ठा
Budh Transit In Mithun 2025: बुध ग्रह साधारणतः १ महिन्यानंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण करतो. ज्याचा व्यवसाय, शेअर बाजार, अर्थव्यवस्था आणि अनेक क्षेत्रांवर परिणाम होतो. व्यवसाय आणि बुद्धीचा कारक ग्रह बुध आपल्या राशी मिथुन राशीत प्रवेश करणार आहे, ज्यामुळे या राशींना आर्थिक लाभ आणि व्यवसायात प्रगतीची संधी मिळत आहे. सविस्तर वाचा
Horoscope Today: वृषभ संक्रांतीला 'या' राशींना होईल नोकरी-व्यवसायात फायदा; तुमच्या राशीचा सुरु होणार का लाभाचा काळ? वाचा राशिभविष्य
आर्थिक राशिभविष्य लाईव्ह अपडेट