-उल्हास गुप्ते

Shivsena And Uddhav Thackeray Astrology: एरवी सरकार पायउतार होणे तसे राजकारणाला काही नवीन नाही. अगदी केंद्रातील भाजपाने सुद्धा भूतकाळात हा अनुभव घेतला आहे.मात्र महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार कोलमडताच असंख्य प्रश्न व वादांना तोंड फुटलं आहे. साहजिकच यावरून उद्धव ठाकरेंची एकूणच राजकीय ताकद कमी झालेली दिसते आहे. उद्धव ठाकरे आता संपले, पुन्हा उठून उभे राहणे शक्यच नाही. शिवसेनाही संपल्यात जमा अशी चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या कुंडलीचा व ग्रह स्थितींचा अभ्यास करून शिवसेना नाव व चिन्ह गमावलेल्या सध्याच्या ठाकरे गटाला बळ देण्यासाठी स्पष्ट सल्ला दिला आहे.

ठाकरेंना ‘शोध’ महत्त्वाचा..

उद्धव ठाकरे यांनी २८ नोव्हेंबर २०१९ रोजी महाराष्ट्राचे २९ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली तो दिवसही त्यांना फारसा चांगला नव्हता पण त्यावेळेच्या घाईगडबडीत शपथविधी होणे खूप गरजेचे होते. पत्रिकेत षष्टेश शनि चतुर्थात वक्री अवस्थेत त्यामुळे स्थावर इस्टेटीची भांडणे कोर्टकचेरीच्या पायरीपर्यंत गेली त्यांना त्यातून खूप मनस्ताप झाला. मंत्रीपद स्वीकारल्यानंतर विरोधी पक्षांच्या प्रश्नांचा भडीमार – त्यात करोना काळ त्यात खूप धावपळ झाली. चतुर्थात गोचरीचे शनी- केतू मानसिक व शारिरीक स्वास्थ बिघडवत होते. कालांतराने पक्षात फूट पडून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर पक्षचिन्ह व शिवसेना पक्षही दूर गेला, अशा करूण अवस्थेत स्वत:ला सावरून ते कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवताना दिसले. येत्या काळातही उद्धव ठाकरे यांना हेच करावे लागणार आहे. नवीन दौऱ्यांतून, नव्या पिढीचे कार्यकर्ते शोधा ते विश्वासू सापडतील, असे त्यांची पत्रिका सांगते आहे.

How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
Sameer Wankhede
समीर वानखेडे यांच्यावरील अनियमिततेचे आरोप गंभीर असल्यानेच चौकशी, एनसीबीचा उच्च न्यायालयात दावा
Mayawati Chandrashekhar Aazad
मायावतींची नवी खेळी; चंद्रशेखर आझाद यांना टक्कर देण्यासाठी पुतण्या रिंगणात
dhairyasheel mane criticizes raju shetty
“पाठिंब्यासाठी दुसऱ्याच्या पायऱ्या का झिजवत आहेत?”, खासदार माने यांची राजू शेट्टी यांच्यावर टीका

उद्धव ठाकरेंना विविध जातीधर्माची माणसे ‘आपला माणूस’ म्हणून पहात होती. ही किमया त्याच्या दशमातील चतुरस्त्र बुधाने केली होती. उद्धव ठाकरे राजकीय प्रवासातून लोकांच्या मनांत पोचले आहेत; त्यांना लोकांच्या मनातून काढणे खूप कठीण असेल. आमदार खासदारापेक्षा त्यांच्यापाठीमागे जी जनशक्ती आहे तीच त्यांची मोठी ताकद ठरेल.

उद्धव ठाकरेंना ‘या’ गोष्टी टाळणेच हिताचे..

उद्धव ठाकरेंच्या कुंडलीत चंद्र राहू ग्रहण योगातून घडेल पण यातूनच उद्याची घडणारी शिवसेना निर्माण होईल, २०२४ ला गुरु ग्रहाचे आगमन त्यांच्या नवम स्थानात होत आहे. तर गुरुच्या महादशेत लाभस्थानातला रवि पुन्हा उदयास येईल आणि महाराष्ट्राला सूर्यदर्शन होईल. तेव्हा आता वादविवाद टाळावे लागतील असे त्यांची पत्रिका सांगते आहे.

हे ही वाचा<< “उद्याची शिवसेना निर्माण होईल पण उद्धव ठाकरेंची कुंडली दोन वर्ष…” ज्योतिषतज्ज्ञ उल्हास गुप्तेंची मोठी भविष्यवाणी

२५ जून २०२५ पासून उद्धव ठाकरेंना मोठी संधी..

उद्धव ठाकरे यांच्या कुंडलीत २५ जून २०२५ ते १ जून २०२६ या काळात काही महत्त्वाच्या उलाढालीचे संकेत आहेत ज्यातून संघटनेला वेगळे बळ नक्कीच प्राप्त होईल. कृष्णपक्षातील षष्ठी ते शुक्ल पक्षातील दशमीपर्यंत चंद्रबळ क्षीण असते, तसेच हा चंद्र सिंहराशीत व्यय स्थानात बसला आहे. त्याबरोबर राहू व प्लुटो युती करत आहेत. एकूण ग्रहांची ही स्थिती मानसिक त्रासात भर घालणारी आहे. पण चतुर्थातील स्वगृहीच्या गुरूचे पाठबळ खूपसा दिलासा देईल. त्यातून परिश्रम, मेहनत यातून यशाचा मार्ग दिसू लागेल. विशेष म्हणजे गुरू महादशेत भाग्यातील मंगळाची महादशा खूपशी मानसिक स्थिरता देईल.