घराचं आपल्या जीवनात खूप महत्त्वाचं स्थान असतं. आपलं घर वास्तुनुसार नसेल तर अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. घरात कायम कटकटी आणि आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. घराची बांधणी व्यवस्थित असेल तर घरात सुख समृद्धी नांदते, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. घरात अडचणी येत असतील काही उपाय वास्तुशास्त्रात दिले आहेत. त्याचा अवलंब करून तुम्ही वास्तू दोष दूर करू शकता. यासोबतच तुमच्या संपत्तीतही वाढ होऊ शकते. वास्तुशास्त्रात अशाच काही झाडांचा उल्लेख करण्यात आला आहे. यामुळे घरात सुख-समृद्धी येते असे मानले जाते. ही झाडे घरात लावल्याने सकारात्मक ऊर्जा तर मिळतेच, शिवाय कुटुंबातील लोकांची प्रगतीही सुरू होते. जाणून घ्या कोणत्या आहेत ही चार झाडे.

तुळशी : ही वनस्पती सहसा प्रत्येकाच्या घरात आढळते. तुळशीच्या पानांचे सेवन करणे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे. तसेच घरात लावल्याने सुख-समृद्धी येते असे मानले जाते. लक्षात ठेवा की ही वनस्पती ईशान्य किंवा उत्तर दिशेला लावावी. ही वनस्पती घराच्या अंगणात ठेवता येते. तुळशीच्या रोपासमोर संध्याकाळी दिवा लावावा. असे मानले जाते की असे केल्याने आई लक्ष्मीची कृपा कायम राहते. या रोपाभोवती स्वच्छतेचीही विशेष काळजी घ्यावी. तुळशीची पाने संध्याकाळनंतर तोडू नयेत. तसेच रविवारी तुळशीच्या रोपाला हात लावू नये.

शमी : ही वनस्पती शनि देवाशी संबंधित असल्याचे मानले जाते. ज्या लोकांच्या कुंडलीत शनिदोष आहे, अशा लोकांनी स्वतःच्या हाताने शमीचे रोप लावावे, असं सांगितलं जातं. तसेच त्याची योग्य प्रकारे पूजा करावी. हे रोप लावल्याने घरात कधीही धन आणि अन्नाची कमतरता भासत नाही. वास्तू दोष दूर होतात. यासोबतच शनि ग्रहही सकारात्मक परिणाम देतो.

Astrology 2022: १४१ दिवस वक्री अवस्थेत असणार कर्मदेवता शनिदेव; चार राशींच्या अडचणीत होणार वाढ

हळद : हे रोप घरामध्ये लावणे खूप शुभ मानले जाते. ते ठेवण्यासाठी सर्वोत्तम स्थान उत्तर किंवा पूर्व दिशा मानली जाते. या रोपाची रोज पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. ही वनस्पती घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मनी प्लांट : वास्तुशास्त्रानुसार, ही वनस्पती खूप शुभ मानली जाते. असे म्हटले जाते की मनी प्लांट घरात लावल्याने आर्थिक संकट दूर होते. ही वनस्पती जितकी हिरवी असेल तितकी चांगली असं मानले जाते. हे झाड नेहमी घराच्या दक्षिण-पूर्व दिशेला ठेवावे. हे रोप उन्हात किंवा सावलीत कुठेही लावता येते. यामुळे संपत्ती आकर्षित होते आणि घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते.