Venus Gochar 2022: शुक्राचे राशी परिवर्तन ज्योतिषशास्त्रात खूप महत्त्वाचे मानले जाते. कारण शुक्रदेव हे धन, वैभव, ऐशोआराम, भौतिक सुखाचे कारक मानले जातात. शुक्र ग्रहाने २३ मे रोजी मेष राशीत प्रवेश केला आहे. ज्याचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येईल. पण ३ राशी आहेत ज्यासाठी हे राशी परिवर्तन फायदेशीर सिद्ध होऊ शकते. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत ही ३ राशी…

मिथुन: २३ मे पासून तुमच्यासाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. कारण तुमच्या ११ व्या घरात शुक्राचे भ्रमण झाले आहे. ज्याला उत्पन्न आणि लाभाचे घर म्हणतात. त्यामुळे यावेळी तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ होईल. यासोबतच उत्पन्नाचे नवे स्रोतही निर्माण होतील. तुम्ही अविवाहित असाल तर तुम्हाला लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो. तसंच या कालावधीत तुम्हाला कोणत्याही व्यावसायिक व्यवहारात चांगले पैसे मिळू शकतात. यासोबतच शुक्र ग्रह तुमच्या दुसऱ्या आणि सातव्या घराचा स्वामी आहे, ज्याला जीवनसाथी आणि भागीदारीचे घर म्हणतात. त्यामुळे जीवनसाथीचा पूर्ण पाठिंबा तुम्हाला त्यावेळी मिळू शकतो. तसेच भागीदारीच्या कामात तुम्हाला चांगले पैसे मिळू शकतात.

कर्क : तुमच्या गोचर कुंडलीत शुक्र दहाव्या भावात भ्रमण करेल. ज्याला कार्यक्षेत्र आणि नोकरी, व्यवसायाची जागा म्हणतात. त्यामुळे यावेळी तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. तसेच तुमच्या कामाच्या आणि नोकरीच्या ठिकाणी बदल होऊ शकतो आणि तुम्हाला इच्छित ठिकाणी पोस्टिंग मिळू शकते. यामुळे तुमची कार्यशैली देखील वाढेल. ज्यामुळे तुमचा बॉस खूश होईल. चंद्रदेव यांच्याशी संबंधित व्यवसाय (अन्न, ट्रॅव्हल एजंट, हॉटेल उद्योग आणि ऑटोमोबाईल) यांच्याशी निगडीत असणार्‍यांसाठी हा काळ लाभदायक आहे. ग्रहांची स्थिती पाहता यावेळी तुम्हाला आईची साथ मिळू शकते. तसेच त्यांच्यामार्फत पैसे मिळू शकतात.

आणखी वाचा : राहू-शुक्र युतीमुळे तयार होतोय क्रोध योग, या राशींवर राहील विशेष प्रभाव, काळजी घ्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मीन: २३ मे पासून तुमच्यावर शुक्राची कृपा असू शकते. कारण तुमच्या गोचर कुंडलीत धन आणि वाणीच्या घरात शुक्राचे भ्रमण झाले आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला व्यवसायात चांगला नफा होऊ शकतो. तसेच कोणत्याही जुन्या व्यवहारात चांगले पैसे मिळू शकतात. शेअर बाजार आणि सट्टा, लॉटरीत गुंतवलेले पैसे हे सध्या तुमच्यासाठी लाभाचे संकेत आहेत. दुसरीकडे शुक्र ग्रह हा तुमच्या तिसऱ्या घराचा स्वामी आहे. ज्याला पराक्रमाचा आत्मा आणि भावा-बहिणीचे स्थान म्हणतात. त्यामुळे यावेळी तुमची शक्ती आणि धैर्य वाढलेले दिसेल. तसेच ज्या लोकांचे करिअर भाषणाशी संबंधित आहे (वकील, शिक्षक, मार्केटिंग काम), त्यांच्यासाठी हा काळ फायदेशीर ठरू शकतो. तुम्ही पुष्कराज घालू शकता. ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल.