Surya Chandra Yuti Vyatipat Yog: ज्योतिष्यशास्त्रानुसार, ग्रहांच्या युतीमुळे योग-संयोग निर्माण होतात ज्यांचे खास महत्त्व असते. ज्या प्रकारे ग्रह-नक्षत्रांचे गोचरचा प्रभाव होतो तसेच ग्रहांच्या योगाचा प्रभाव देखील प्रत्येक व्यक्तीवर होतो. ज्योतिष्यशास्त्राानुसार, सूर्य आणि चंद्राची युती ५ मे रोजी सकाळी १०वाजून १२मिनिटांनी होईल.

मेष राशी (Aries Zodiac sign )

सूर्य-चंद्राच्या युतीमुळे निर्माण होणारा व्यतिपात योग मेष राशीसाठी अनुकूल आहे. या दुर्मिळ योगाच्या शुभ प्रभावामुळे पैशाशी संबंधित समस्या दूर होतील. व्यवसायात आर्थिक विस्तार होईल. तुमच्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळू शकेल. परदेश प्रवासाचा योग होईल. नोकरीत परिस्थिती चांगली आहे. पदोन्नतीची बात होऊ शकते. आरोग्य अनुकूल राहील.

कर्क राशी (Cancer Zodiac Sign )

कर्क राशीच्या लोकांसाठी सूर्य-चंद्र युती योग शुभ आहे. या योगाच्या प्रभावामुळे नोकरीत पदोन्नती शक्य आहे. व्यवसायात प्रचंड आर्थिक विस्तार पाहायला मिळेल. मागील गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळू शकेल. मानसिक स्थिती चांगली राहील. वैवाहिक जीवनात जोडीदाराला भरपूर पाठिंबा मिळेल. दैनंदिन उत्पन्न वाढेल.

सिंह राशी (Leo Zodiac Sign )

सिंह राशीच्या लोकांना सूर्य आणि चंद्र दोघांचेही आशीर्वाद मिळतील. व्यतिपात योगाच्या शुभ प्रभावामुळे तुम्हाला कोणत्याही मोठ्या आर्थिक संकटातून मुक्तता मिळेल. व्यवसाय वाढेल आणि पैसा येईल. कुटुंबातील कोणत्याही शुभकार्यात तुम्ही सहभागी होऊ शकता. वैवाहिक जीवन आनंदी राहील. तुमच्या कामाच्या आधारावर तुम्हाला नोकरीत पदोन्नती मिळू शकते.

कन्या राशी ( Virgo Zodiac Sign )

कन्या राशीच्या लोकांसाठी सूर्य-चंद्र युती योग देखील फायदेशीर आहे. या दुर्मिळ योगाच्या शुभ प्रभावामुळे नोकरीत बढतीचा मार्ग मोकळा होईल. कामातील अडथळे दूर होतील. व्यापारात आर्थिक विस्तार होईल. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना चांगली बातमी मिळेल. पैसे कमविण्याच्या अनेक संधी उपलब्ध होतील. अचानक पैसे मिळवण्याचा योग आहे.

धनु राशी (Sagittarius Zodiac Sign )

सूर्य आणि चंद्राच्या दुर्मिळ व्यतिपात योगाच्या प्रभावामुळे धनु राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस येतील. व्यवसाय करणार्‍यांचे दैनंदिन उत्पन्न वाढेल. पैसे गुंतवल्याने चांगला परतावा मिळू शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांचा पगार वाढू शकतो. आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल. तुम्हाला काही चिंतांपासून आराम मिळू शकेल.