Weekly Horoscope 22 To 28 September 2025: ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीनुसार सप्टेंबर महिन्याचा चौथा आठवडा अतिशय चांगला जाणार आहे. या आठवड्याची सुरुवात शारदीय नवरात्रोत्सवाने सुरू होत आहे तर समारोप षष्ठी तिथीने होणार आहे. या काळात अनेक राजयोगांची निर्मिती होणार आहे. या आठवड्यात सूर्य आणि बुध कन्या राशीत, मंगळ तुला राशीत, शुक्र सिंह राशीत, शनी मीन राशीत, राहू कुंभ राशीत आणि केतु सिंह राशीत विराजमान असतील. या आठवड्यात काही राशींना भाग्याची साथ लाभणार आहे. अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील तसेच धन-धान्याची वाढ होईल. यासह माता दुर्गेची विशेष कृपा मिळण्याची शक्यता आहे.

सप्टेंबरच्या या आठवड्यात महालक्ष्मी, नवपंचम, षडाष्टक, समसप्तक, बुधादित्य यांसारखे अनेक राजयोग निर्माण होणार आहेत, ज्यामुळे काही राशींना विशेष लाभ मिळू शकतो.

मेष साप्ताहिक राशिफल (Aries Weekly Horoscope)

हा आठवडा तुमच्यासाठी ऊर्जा आणि नवी संधी घेऊन येईल. ऑफिसमध्ये नवीन प्रोजेक्ट मिळू शकतात, ज्यातून तुमची क्षमता सिध्द होईल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल, परंतु खर्चांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. कौटुंबिक जीवनात थोडे चढउतार येऊ शकतात. जीवनसाथीबरोबर वेळ घालवणे महत्त्वाचे राहील. आरोग्य सामान्य राहील, योग आणि ध्यानाचा फायदा होईल.

वृषभ साप्ताहिक राशीभविष्य (Taurus Weekly Horoscope)

तुमच्या संयम आणि परिश्रमाची परीक्षा होईल. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांची मदत मिळेल, पण काही विरोधकही तयार होतील. धनप्राप्ती सुरू राहील, मात्र गुंतवणूक विचारपूर्वक करा. कुटुंबात एखाद्या शुभकार्याची चर्चा होऊ शकते. अविवाहित लोकांना विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात. आरोग्याच्या दृष्टीने पचनसंस्थेकडे लक्ष द्या.

मिथुन साप्ताहिक राशीभविष्य (Gemini Weekly Horoscope)

या आठवड्यात निर्णय घेताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. नोकरीत पदोन्नती किंवा मान-सन्मान मिळू शकतो. व्यापाऱ्यांसाठी वेळ लाभदायक असेल. शिक्षण आणि स्पर्धेत विद्यार्थ्यांना यश मिळेल. प्रेमजीवनात गोडवा वाढेल, परंतु अपेक्षा जास्त ठेवू नका. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः पुरेशी झोप घ्या.

कर्क साप्ताहिक राशीभविष्य (Cancer Weekly Horoscope)

भावनांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. ऑफिसमध्ये तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाईल. आर्थिक स्थिती मजबूत राहील, अडकलेले पैसे परत मिळतील. कुटुंबात सुख-शांतीचे वातावरण असेल. धार्मिक किंवा सामाजिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. जोडीदाहारबरोबरचे संबंध अधिक मधुर होतील. आरोग्य उत्तम राहील.

सिंह साप्ताहिक राशीभविष्य (Leo Weekly Horoscope)

आत्मविश्वास वाढेल आणि तुमच्या कामांना वेग मिळेल. नोकरीत वरिष्ठ अधिकारी तुमची प्रशंसा करतील. व्यापाऱ्यांना नवे कॉन्ट्रॅक्ट मिळू शकतात. आर्थिक स्थिती सुधारेल. कुटुंबात एखाद्या छोट्या सदस्याच्या यशामुळे आनंदाचे वातावरण तयार होईल. प्रेमसंबंधांमध्ये जवळीक वाढेल. आहारात संतुलन ठेवा अन्यथा पोटाच्या तक्रारी होऊ शकतात.

कन्या साप्ताहिक राशीभविष्य (Virgo Weekly Horoscope)

हा आठवडा थोड्या आव्हानांनी भरलेला असेल. कार्यस्थळी जबाबदाऱ्या वाढू शकतात. आर्थिक बाजू थोडी डळमळीत राहील, परंतु धैर्य ठेवा. कुटुंबातील एखाद्याचे आरोग्य चिंतेचे कारण होऊ शकते.जोडीदाराबरोबर मतभेद होऊ शकतात, त्यामुळे संवाद स्पष्ट ठेवा. ध्यान आणि योगाने ताण कमी होईल.

तूळ साप्ताहिक राशीभविष्य (Libra Weekly Horoscope)

हा आठवडा तुमच्यासाठी भाग्यवर्धक ठरेल. करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळेल. व्यवसायातही लाभाची शक्यता आहे. आर्थिक स्थिती मजबूत राहील. कुटुंबाबरोबर प्रवासाचा योग आहे. अविवाहितांना शुभवार्ता मिळू शकते. प्रेमजीवनात सकारात्मक बदल होईल. आरोग्य चांगले राहील, परंतु नियमित व्यायाम करा.

वृश्चिक साप्ताहिक राशीभविष्य (Scorpio Weekly Horoscope)

तुमच्या मेहनतीचा आणि नियोजनाचा फायदा मिळेल. नोकरीत नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. व्यापाऱ्यांसाठी वेळ सरासरी राहील. आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. कुटुंबाबरोबर वेळ घालवला तर मन प्रसन्न राहील. प्रेमसंबंधांमध्ये चढउतार येऊ शकतात. आरोग्याबाबत निष्काळजी राहू नका, विशेषतः रक्तदाबावर लक्ष ठेवा.

धनु साप्ताहिक राशीभविष्य (Sagittarius Weekly Horoscope)

हा आठवडा प्रवासांनी भरलेला राहील. कामकाजात व्यस्तता वाढेल. विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना शुभवार्ता मिळू शकते. आर्थिक बाजू मजबूत राहील, पण खर्चही जास्त होण्याची शक्यता आहे. कुटुंब आणि मित्रांसोबत चांगला वेळ जाईल. जोडादाराचा सहयोग मिळेल. आरोग्य ठीक राहील, पण थकव्यापासून सावध राहा.

मकर साप्ताहिक राशीभविष्य (Capricorn Weekly Horoscope)

कार्यस्थळी मेहनतीचे फळ मिळेल. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहयोग लाभेल. व्यवसायात नफा होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती स्थिर राहील. कुटुंबातील संबंध अधिक दृढ होतील. प्रेमजीवनात अपेक्षित यश मिळेल. आरोग्याच्या बाबतीत जुना आजार कमी होईल.

कुंभ साप्ताहिक राशीभविष्य (Aquarius Weekly Horoscope)

तुमच्या योजना यशस्वी ठरतील आणि नवी संधी मिळतील. नोकरीत पदोन्नती किंवा बदली होऊ शकते. व्यवसायात भागीदारीतून लाभ होईल. कुटुंबात सुख-शांतीचे वातावरण राहील. प्रेमसंबंध दृढ होतील. आरोग्य चांगले राहील, परंतु हवामानातील बदलांपासून सावध राहा.

मीन साप्ताहिक राशीभविष्य (Pisces Weekly Horoscope)

या आठवड्यात मानसिक शांतता आणि संतुलन राखणे आवश्यक आहे. कार्यक्षेत्रात सहकाऱ्यांचा सहयोग मिळेल. आर्थिक बाजू चांगली राहील, अडकलेली कामे पूर्ण होतील. कुटुंबात एखादा मंगल प्रसंग घडू शकतो. अविवाहितांसाठी विवाहयोग आहे. आरोग्याच्या दृष्टीने झोप आणि आहाराकडे विशेष लक्ष द्यावे.