Personality Traits According To Numerology : मूलांक आणि भाग्यांक या दोन्हींच्या आधारे तुमची शारीरिक क्षमता, स्वभावातील गुण-दोष, विचार करण्याची पद्धत, नोकरी-उद्योगधंद्यातील चढ-उतार, वैवाहिक जीवन, करिअर या बाबतीत माहिती उपलब्ध होऊ शकते. त्यासाठी तुम्हाला मूलांका काढावा लागतो, जो खूपच सोपा असतो. मूलांक संख्या ही १ ते ९ पर्यंत असते आणि प्रत्येक संख्या कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संबंधित असते. तर आज आपण अशा मूलांक असणाऱ्या व्यक्तींबद्दल जाणून घेणार आहोत; ज्यांना भरपूर यश मिळते आणि संपत्ती नेहमीच त्यांच्याबरोबर राहते.
तर, अंकशास्त्रानुसार १ मूलांक असणारे लोक खूप भाग्यवान असतात. १ मूलांक म्हणजे कोणत्याही महिन्याच्या १, १०, १९ किंवा २८ तारखेला जन्म घेतलेली मंडळी. या संख्येचा स्वामी ग्रह सूर्य असतो; ज्याला ग्रहांचा राजा, असे म्हटले जाते.
१ मूलांक असणारे लोक धैर्य, आत्मविश्वास व कठोर परिश्रमाने यश मिळवतात. देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने त्यांना कधीही संपत्ती, सन्मानाची कमतरता भासत नाही. त्यांच्यात नेतृत्व क्षमता असते; त्यामुळे ते राजेशाही जीवन जगतात. १ मूलांक असणारे लोक स्वभावाने धाडसी, आत्मविश्वासू असतात. त्यांच्यात कोणत्याही परिस्थितीला धैर्याने तोंड देण्याची क्षमता असते. त्यामुळे देवी लक्ष्मीचा त्यांच्यावर विशेष आशीर्वाद असतो. मेहनती स्वभावामुळे त्यांना संपत्ती व आदर मिळतो आणि भविष्यात ते खूप श्रीमंत होतात.
कठोर परिश्रमाने कोणत्याही क्षेत्रात कमावतात नाव (Personality Traits According On Numerology)
मूलांक १ असणाऱ्यांचे व्यक्तिमत्त्व लोकांना सहज आकर्षित करून जाते. त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीमुळे कधी कधी ते इतरांचे आवडते होऊन जातात. तसेच, स्वभावाने हट्टी असल्यामुळे एखादे काम करायचे ठरवले, तर ते पूर्ण केल्याशिवाय ते स्वस्थ बसत नाहीत. त्यांच्यातील ऊर्जा आणि त्यांनी घेतलेले कठोर परिश्रम याद्वारे ते कोणत्याही क्षेत्रात नाव कमावतात.
१ मूलांक असणारे लोक प्रत्येक क्षेत्रात सूर्यासारखे चमकतात. त्यांच्या आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. स्वतंत्र विचार करण्याची सवय असल्यामुळे त्यांना स्वतःच्या निर्णयांमध्ये कोणाचाही हस्तक्षेप आवडत नाही. हेच कारण आहे की, या क्रमांकाचे बहुतेक लोक व्यवसायाकडे आकर्षित होतात आणि त्यात यशदेखील मिळवतात.