डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी उप कुलसचिव ईश्वर मंझा यांना अटक करण्यात आली. सहाय्यक कारकून पदावर नोकरी लावतो असं आमिष दाखवून त्यांनी चिकलठणातील एका तरुणाला फसवले होते.

ईश्वर मंझा हे उस्मानाबाद येथे विद्यापीठाच्या उपकेंद्रात उप कुलसचिव म्हणून कार्यरत होते. देवनाथ चव्हाण आणि ईश्वर मंझा यांची २०१५ मध्ये भेट झाली. विद्यापीठात मोठ्या प्रमाणात जागा निघणार आहेत. मी मोठ्या पदावर असून तुझं काम करुन करतो, असं आमिष त्यांनी तरुणाला दाखवलं. त्यासाठी सहा लाख रुपयांची मागणी करण्यात आली. यानुसार ऑक्टोबर २०१५ मध्ये त्याने मंझा यांना तीन लाख रुपये दिले. देवनाथ चव्हाण आणि त्याच्या भावाने उर्वरित पैसे जमा केले. पैसे तयार केले असून ऑर्डर कधी काढता अशी विचारणा त्यांनी मंझा यांच्याकडे केली. मात्र मंझा यांनी टाळाटाळ केल्याने संशय आला आणि त्यांनी पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांच्याकडे धाव घेतली. यानंतर पोलिसांनी सातारा येथून मंझा यांना अटक केली