News Flash

परभणी: जेवणातून २२ मुलांसह ३० जणांना विषबाधा

राजुरा इथे हरिनाम सप्ताहामध्ये जेवणानंतर काहींना त्रास सुरू झाला.

राजुरा इथे हरिनाम सप्ताह सुरु आहे. या सप्ताहामध्ये जेवणानंतर काही मुलांना मळमळ आणि उलटीचा त्रास होऊ लागला.

परभणी जिल्ह्यातील मानवत येथे ३० जणांना जेवणातून विषबाधा झाली. यामध्ये २२ लहान मुले आणि मुलींचा समावेश आहे. सर्वांना उपचारासाठी परभणी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सर्वांची प्रकृती सुखरूप आहे.
मानवत तालुक्यातील राजुरा या गावात आज (रविवार) ही घटना घडली. राजुरा इथे हरिनाम सप्ताह सुरु आहे. या सप्ताहामध्ये जेवणानंतर काही मुलांना मळमळ आणि उलटीचा त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना तात्काळ मानवत ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर काहींना परभणी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. दोन्ही ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरु असून आता घाबरण्याचे काही कारण नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सर्वांची प्रकृती सुखरूप असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2017 4:24 pm

Web Title: poisoning in food in manwath parbhani 30 admitted
Next Stories
1 तूर खरेदी बंद, शेतकरी संतप्त
2 अलिशान गाड्यातून देशी दारुची तस्करी, १४.१९ लाखाचा मुद्देमाल जप्त
3 लातूरमध्ये शून्यातून भाजप सत्तेत!
Just Now!
X