scorecardresearch

औरंगाबाद : समृध्दी महामार्गावर शिंदे गटाच्या वाहनांचा अपघात; मेळाव्यासाठी जाणारे कार्यकर्ते जखमी

अचानक ब्रेक दाबल्याने चार वाहने धडकली.

औरंगाबाद : समृध्दी महामार्गावर शिंदे गटाच्या वाहनांचा अपघात; मेळाव्यासाठी जाणारे कार्यकर्ते जखमी
समृध्दी महामार्गावर शिंदे गटाच्या वाहनांचा अपघात

शिवसेना बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे लोकार्पण व्हायच्या आधीच त्यावरून मुंबईकडे दसऱ्या मेळाव्यासाठी निघालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील कार्यकर्त्यांच्या वाहनांना अपघात घडला. अचानक ब्रेक दाबल्याने चार वाहने धडकली.

यात १० ते १२ कार्यकर्ते जखमी झाले, परंतु वाहनांचे मोठे नुकसान झाले. समृद्धी महामार्गावरील जठवड्याजवळ मंगळवारी सायंकाळी हा अपघात घडला. जालन्याचे माजी आमदार अर्जुन खोतकर यांचे समर्थक असलेले कार्यकर्ते चार वाहनांतून मुंबईकडे निघाले होते.

मराठीतील सर्व औरंगाबाद ( Aurangabad ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या