बीड : वैद्यनाथाची धार्मिक परळी पुढे गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने राजकीय पटावर चर्चेत आली. तिची औद्याोगिक ओळख औष्णिक वीज केंद्राची. या केंद्रातून निघणाऱ्या राखेभोवती परळीचे अर्थकारण, राजकारण आणि समाजकारण तरंगते. राखेतून होणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारावर वाल्मीक कराड या एकाच व्यक्तीचा प्रभाव असल्याचे आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केल्यानंतर यावर राज्यस्तरीय चर्चा सुरू झाली. पण त्यावर परळीकरांची प्रतिक्रिया एकच…‘श्शऽऽऽ… शांतता राखा!’

परळीमधील वीज केंद्राच्या तीन युनिटमधून ७५० मेगावॉट वीज निर्मितीच्या प्रकल्पातून किती राख निर्माण होऊ शकते, याची गणिते कोळशाच्या प्रकारावर अवलंबून आहेत. पण एकूण जाळल्या जाणाऱ्या कोळशाच्या ४० टक्के राख तयार होते. कोरडी राख सिमेंट कंपन्यांना ५६२ रुपये प्रति टन दराने विकली जाते आणि वीट भट्टी चालवणाऱ्यांना ती सवलतीच्या दराने २०० रुपये प्रति टन दराने विकली जाते. या राखेच्या निविदा निघतात आणि सिमेंट कंपन्या ती राख घेऊन जातात. यातील खरी गोम पुढे आहे. ओली राख ज्या राखेच्या तलावात आणली जाते. ते गाव आहे दाऊदपूर. दाऊदपूरमधील श्रीमंतीचे अर्थकारण येथे दडले आहे.

bull hit a man in dound pune
VIDEO: पायी जाणाऱ्या नागरिकाला वळूने शिंगाने उचलून आपटले, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Eknath Shinde visiting Nashik faction Shiv Sena
एकनाथ शिंदे यांच्या आभार दौऱ्यावरून शिवसेनेत गटबाजी
Three drunken arrested for assaulting policemen
मद्यपींची पोलिसांना धक्काबुक्की; तिघे अटकेत
controversial statements by bjp union minister
भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या विधानांमुळे वाद; विरोधकांच्या टीकेनंतर सुरेश गोपी यांची सारवासारव
Maharahstra Kesari
Maharahstra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मोठा गोंधळ, पैलवान शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारल्याचा आरोप, नेमकं काय घडलं?
Two tigers fight both locked in ferocious fight tourists recorded shocking video goes viral
VIDEO: लढाई अस्तित्वाची! जेव्हा दोन वाघ समोरा-समोर येतात तेव्हा काय घडतं? पर्यटकांनीच रेकॉर्ड केला थरारक प्रकार
notorious gangster gajya marne
कुख्यात गुंड गजा मारणे याच्या चित्रीकरणाचा प्रसार; चार महाविद्यालयीन विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

हेही वाचा : बाहुबलीचे बीड : बीडच्या दहशतीला पवनऊर्जेचे वारे!

औष्णिक वीज केंद्रापासून अगदी दोन किलोमीटरवरील दाऊदपूरमध्ये प्रत्येक घरावर राखेचा थर. या गावात घरे कमी आणि बंगले जास्त. तेही तीन मजली वाटावेत एवढ्या उंचीचे, आलिशान आणि टोलेजंग! औष्णिक वीज प्रकल्पास जमीन दिल्याने प्रकल्पग्रस्त म्हणून नोकरी लागलेला एक या गावातील. बाकीचे काही राखेच्या व्यवहारात. यात बहुतांश मंडळी बाहुबली. याच भागातील तरुणांनी हवेत गोळीबारही केला होता. समाजमाध्यमांवर छायाचित्र टाकून दहशत पसरविल्याचा गुन्हा अलीकडेच नोंदविण्यात आला. कोणी खंडणी मागतो, कोणी हाणामाऱ्या करतो, कोणाच्या नावावर अर्धमेला केल्याचा गुन्हा तर कोणी खुनाच्या आरोपात अडकलेला. भय निर्माण करणाऱ्या या प्रक्रियेमुळे परळीकर या व्यवहारावर ब्र शब्दही काढत नाहीत. परळीतील प्रत्येक निधीवर, प्रत्येक व्यवहाराचा कारभार वाल्मीक कराडकडे असतो. नेत्यांचे काम होकार किंवा नकार एवढेच. ‘करा की तेवढं काम,’ अशी विनंती वजा धमकी आली की अधिकारीही लगबगीने कामे करतात.

२०२१ पर्यंत ही ओली राख मोफत देण्यास मुभा होती. पण त्यानंतर केंद्र शासनाने या राखेचा जाहीर लिलाव करावा अशी तरतूद केली. अलीकडेच केलेल्या लिलावामध्ये या ओल्या राखेचा दर ३५३ रुपये आला. पारसमध्ये ४१९, भुसावळमध्ये १९२ आणि नाशिकमध्ये ५५८ रुपये असे दर आहेत, असे औष्णिक वीज केंद्रातील राख व्यवस्थापन क्षेत्रातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. परळीमध्ये ओली राख कंत्राटदारास उचलूच दिली जात नाही. स्थानिक पातळीवर काही जणांनी कंपन्या सुरू केल्या. त्यातून राख उचलणाऱ्यांची दहशत एवढी की, या भागात कोणी फिरकत नाही. ओली राख, विहिरीतील राख यामध्ये परळीतील वजनदार मंडळी गुंतलेली. त्यामुळे परळीकर या वाटेनेही जात नाही. या भागात दंडात बेटकुळी असणाऱ्या तरुणांची संख्या अधिक. ही मंडळी समर्थक. त्यामुळे यू- ट्यूबवर येणाऱ्या मजकुरावर पटकन मजकूर लिहिणारा याच भागातील.

हेही वाचा : संतोष देशमुख हत्या प्रकरण: पसार आरोपी ‘वाँटेड’ घोषित

शहरातील चौकात एक मनोरा. परळीकर त्याला ‘टॉवर’ म्हणतात. येथून ‘बाहुबलीं’ची परळी हालते. येथे दीडशे – दोनशे लोक उभे असतात. यातील बहुतेकांच्या हाती दोन मोबाइल असतात. हातात लाल- पिवळ्या रंगाचा दोरा घालणे आवश्यक. बाहुबलींचे कार्यकर्ते तसे धार्मिकवृतीचे. वैद्यानाथाची परळी ही ओळख जपणारे काही जण गंध लावतात, वाल्मीक कराड लावतात तसे.

राजकीय पटलावर अडचणीत असल्यावर अधिक भपका करायचा असतो, हे धनंजय मुंडे आणि पंकजाताईंच्या कार्यकर्त्यांना सांगावे लागत नाही. तो डामडौल तालुक्याच्या पातळीवर परळीच्या चौकाचौकात भडकपणे फलकावर दिसतो. त्यावर हात लागला की राख हाती लागते.

‘नाके’बंदी आणि मुस्कटदाबी

या व्यवहारातून मिळणाऱ्या पैशातून बीएमडब्लूपासून ते फॉर्च्यूनरपर्यंत गाड्या दाऊदपूरसारख्या छोट्या गावातही दिसतात. त्याचे कौतुक दाऊदपूरमध्ये नाही आणि चार किलोमीटरवर असणाऱ्या परळीमध्ये तर नाहीच नाही. बाकी गावभर राखेचा एक थर कधी जमतो ते कळतच नाही. कोणाची ओरड नाही. तक्रारही नाही. प्रदूषण नियंत्रण कार्यालय मात्र परभणीमध्ये. प्रदूषण मंडळाची एखादी नोटीस तशी प्रभावशून्य. त्यामुळे श्वसनाचे आजार, त्वचेचे रोग अशा रुग्णांची संख्या अधिक. या अनुषंगाने परळी येथील डॉक्टर म्हणाले, ‘श्वसनविकार, त्वचाविकार या भागात आहेतच प्रदूषणाचे आरोग्यावर परिणाम होणारच.’

हेही वाचा : Nandkumar Ghodele : ठाकरे गटाला मोठा धक्का; छत्रपती संभाजीनगरमधील ‘हा’ नेता शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार

कोळशातले काळेबेरे

कोळसा कोणत्या दर्जाचा, यावर राखेचे प्रमाण ठरते, असे या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात. कोळसा कोणत्या खाणीतून आला. तो कोणत्या थरात सापडलेला होता. यावर त्यातून राख किती निर्माण होते, याचा अंदाज काढता येतो. कोळशाच्या प्रतीवर विजेचे दर अवलंबून असतात. प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालविण्यासाठी आयात केलेला कोळसा आणि भारतीय कोळसा याचे मिश्रण वापरले जाते. विजेचा दर आणि त्याच्या खरेदीची माहिती दिली जात असली तरी कोळशाची माहिती उघड होत नाही. कोळसा धुतला की त्यातील राखेचे प्रमाण कमी होते. पण तो धुऊन येत नाही. त्यामुळे कोळसा जाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात इंधनाचा उपयोग करावा लागतो. गेल्या काही वर्षात कोळसा जाळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या इंधनामध्ये घट झालेली नसल्याचे निरीक्षणही ‘महाजनको’ मधील अधिकारी सांगतात.

Story img Loader