छत्रपती संभाजीनगर : भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष, आमदार रवींद्र चव्हाण हे शनिवारी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असल्याची माहिती देण्यात आली. शनिवारी सकाळी ते माजलगाव तालुक्यातील किट्टी आडगाव येथे भाजपचे पदाधिकारी दिवंगत बाबासाहेब आगे यांच्या निवासस्थानी भेट देणार आहेत. सांत्वनपर ही भेट असेल.

दोन महिन्यांपूर्वी बाबासाहेब आगे यांचा एका माथेफिरूने खून केला होता. त्यानंतर आमदार चव्हाण हे परळीत पोहोचतील. परळीमध्ये ते वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतील. त्यानंतर आमदार चव्हाण हे २६ मे रोजी अपघाती निधन झालेले माजी आमदार आर. टी. देशमुख यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन करणार आहेत. दुपारी ते समृद्धी महामार्गाने डोंबिवलीला परतणार असल्याचे कळवण्यात आले.