कार्यकारी अभियंत्याकडून रिव्हॉल्व्हरची मागणी तर दोन नेत्यांवर गुन्हे

औरंगाबाद: नेकनूर येथे पकडण्यात आलेल्या ३० लाख रुपयांच्या  गुटखा प्रकरणात शिवसेना जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्यावर पत्त्याचा क्लब स्वमालकीच्या जागेत चालविल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल झाला. या दोन राजकीय नेत्यांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर बीडमध्ये काय चालले आहे, असा प्रश्न उपस्थित होत असतानाच अंबाजोगाई विभागातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस. एस कोकणे यांनी रिव्हॉल्व्हर दिल्याशिवाय काम करता येणार नाही, असे मत जिल्हाधिकाऱ्यांकडे नोंदविण्यात आले. यामुळे बीडचे राजकारण कुठे चालले आहे अशी शंका निर्माण झाली आहे. या साऱ्या प्रकारांनंतर  समाजकल्याणमंत्री व पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी पोलिसात तक्रार दिल्यास कारवाई केली जाईल. कोणालाही पाठीशी घालणार नाही, असे सांगितले खरे, पण त्यावर भाजपकडूनही आता प्रश्न विचाराले जाऊ लागले आहेत. आता बंदुकीच्या मागणीने बीडच्या राजकारणाचा गुन्हेगारी पोत पुन्हा चर्चेत आला आहे.

Narendra Modi, Pune, Road Show,
पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जाहीर सभेबरोबरच ‘रोड शो’
Narendra Modi, Pune, Road Show,
पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जाहीर सभेबरोबरच ‘रोड शो’
arvind kejriwal
‘आप’चे अस्तित्व संपविण्याचा प्रयत्न; केजरीवाल यांच्या सुटकेच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान वकिलाचा दावा
aam aadmi party AAP
आपचे खासदार संजय सिंह यांना मिळालेल्या जामिनाचे कारण काय? त्यांच्या वकिलांकडून नेमका काय युक्तिवाद करण्यात आला?

राजकीय व्यासपीठावर पांढऱ्या शर्टखाली रिव्हॉल्व्हर लटकवलेल्या कार्यकर्त्यांची संख्या बीड जिल्ह्यात तशी लक्षणीयच. अगदी सामाजिक कार्यकर्त्यांनाही जिल्ह्यात वावरताना रिव्हॉल्व्हर लागते. सार्वजनिक बांधकाम खात्यातील कारभार, गैरव्यहार व टक्केवारीने काम करण्याची पद्धत यावर आता कोणी चर्चाही करत नाही. सार्वजनिक बांधकाम विभागातील घोटाळय़ांबाबत विधिमंडळ अधिवेशनात गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांनी अलिकडेच आवाज उठवला होता. पण त्यावर कोणी सरकारी अधिकाऱ्याने भाष्य केले नव्हते. पण संजयकुमार कोकणे यांच्या पत्रामुळे बीडमधील कार्यपद्धतीवर नव्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. कोकणे यांनी लिहिलेल्या पत्रातील मजकूर आणि त्यांच्या अंबाजोगाईत रुजू होऊन २० दिवसाच्या कालावधीत त्यांनी घेतलेले अनुभवावरुन बीडमध्ये नक्की काय सुरू आहे, याचा अंदाज येऊ शकतो.

या पत्राला आता राजकीय हत्यार म्हणून वापरण्यास सुरुवात झाली आहे. एखादा अधिकारी स्वसंरक्षणाची मागणी करतो ही बाबच लाजिरवाणी असल्याचे सांगत  पंकजा मुंडे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.  बीड जिल्ह्यात रिव्हॉल्वरची संख्या किती याबाबत पोलीस अधीक्षक राजा यांना विचारले असता ते म्हणाले, ‘ इतर जिल्ह्यातील रिव्हॉल्व्हरची संख्या तशी हाताशी नाही पण बीड जिल्ह्यातील परवानाधारकांची संख्या १३००च्या घरात असेल. ही संख्या तशी अधिक आहे.’ एका बाजूला  अधिकारी स्वसंरक्षण मागत आहेत आणि नेत्यांची वेगवेगळया अवैध धंद्यातील सहभाग स्पष्टपणे पुढे येत आहे. गुटखा प्रकरणात कुंडलिक खाडे यांच्या सहभागानंतर त्यांना त्या पदावर ठेवण्यात आले नाही आणि बीड जिल्ह्यात नव्या जिल्हाप्रमुखाचीही निवड झालेली नाही. भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या भावाच्या मालकीच्या जागेत हा पत्त्याचा क्लब चालू होता. त्यामुळे आपला त्यात सहभाग नव्हता असा खुलासा जरी राजेंद्र मस्केकडून केला जात असला तरी जुगार क्लब चालविण्याची हिंमत करण्याचे बळ येते कोठून असाही प्रश्न निर्माण केला जात आहे. या घटनांमुळे बीडच्या राजकारणाचा गुन्हेगारी पोत पुन्हा सामोर आला आहे.

अर्जाने खळबळ

१६ डिसेंबर रोजी संजयकुमार कोकणे अंबाजोगाई विभागात रुजू झाले. या विभागात केज, धारुर, माजलगाव, अंबाजोगाई व परळी तालुक्याचा समावेश आहे. यातील परळी व केज मतदारसंघ तसा संवेदनशील मानला जातो. नाशिक येथील मूळ रहिवासी असलेल्या कोकणे यांनी रिव्हॉल्व्हर मिळण्याचा विनंतीचा अर्ज रुजू झाल्यानंतर केवळ १५ दिवसांनी केला. ते जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात म्हणतात,‘ देयके अदा करताना या विभागात अनागोंदी कारभार सुरू होता. काही कंत्राटदार कार्यकारी अभियंता व विभागीय लेखापाल व कर्मचाऱ्यांना कंत्राटदार धमाकावून सह्या घेतात. रात्री- अपरात्री कंत्राटदार अवैध देयकावर सह्या घेतात. असे प्रकार या पूर्वी घडलेले आहेत. त्यामुळे बांधकाम विभागात काम करण्यास रिव्हॉल्व्हरची गरज भासेल व ती जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांच्या छाननीनंतर उपलब करून देण्याची मागणी त्यांनी केली आहे.’ त्यांच्या या पत्रामुळे बीडसह राज्यातील बांधकाम विभागाच्या कार्यशैलीवरही प्रश्न उभे केले जात आहेत.