सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाचे उल्लेखनीय कार्य
पोफळा हे ७०-७२ उंबऱ्याचे गाव. डोंगराला चिकटून वसलेले. टणक बेसाल्ट खडकामुळे पाणी मुरण्याचे प्रमाण नगण्यच. त्यामुळे दिवाळीनंतर पाणीटंचाई पाचवीला पुजलेली. भर उन्हाळ्यात शेजारच्या मोरहिरा गावातून ५ किलोमीटर अंतरावरून पिण्यासाठी पाणी आणावे लागे. त्यामुळे शेतीची पुरती वाताहत. सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाचे कार्यकत्रे येथे पोहोचले, तेव्हा गावात पाणी येऊ शकते, हे सांगण्यात त्यांचा बराच वेळ गेला. डोंगर फोडून चर खणला तर वाहून जाणारे पाणी अडवता येते, हे समजावून सांगणे कठीणच होते. पण यासाठी एका कंपनीच्या सामाजिक दायित्वाची रक्कम मिळाली. डोंगरात चर खणून पाणी वळविण्यात आले.
आता लोक खूश आहेत. तीव्र दुष्काळ पडला तरी सामना करण्याची िहमत त्यांना दिली जात आहे. पोफळा हे एकमेव गाव नाही तर औरंगाबाद व जालना या दोन जिल्ह्य़ांतील १०२ गावांची भौगोलिकता आणि मानसिकता तपासत ही संस्था दुष्काळ निर्मूलनासाठी घट्ट पाय रोऊन उभी ठाकली आहे.
दुष्काळाची दाहकता सांगणारे अनेक जण. पाणलोट योजनांतून मिळणाऱ्या कोटय़वधींवर डोळा ठेवून संवेदनशीलतेने वावरणारेही खूप. पण दुष्काळाशी पाय रोवून लढा देताना रोज काम करणारे, शेतकऱ्यांना मानसिक आधारासह त्यांची आíथक घडी बसावी यासाठी झगडणारे मोजकेच. औरंगाबादमधील सावित्रीबाई फुले एकात्म समाज मंडळ या संस्थेने सुरू केलेल्या कामामुळे हळूहळू बदल होऊ लागले आहेत. ‘जमीन, पाणी, शेती, आरोग्य असे साकल्याने सर्व क्षेत्रात काम केले तरच दुष्काळाशी लढा उभारता येतो,’ असे या संस्थेचे समन्वयक डॉ. प्रसन्न पाटील सांगतात.
शेतकऱ्यांच्या सहली, गावातील विहिरींच्या पुनर्भरणासाठी उतारावर पाझरणारा रामकुंड, डोहरचना करीत गावागावांत अस्तित्वात असणारे पाण्याचे स्रोत मजबूत करण्यावर संस्थेने जोर दिला. काही कंपन्यांकडून सामाजिक दायित्वाची रक्कम मिळविली. काही गावांसाठी ‘नाबार्ड’चे सहकार्य घेतले आणि बंधाऱ्यांच्या दुरुस्तींपासून उत्पादनवाढीचे अनेक प्रयोग हाती घेण्यात आले.
ठिबक सिंचनासाठी बँकांकडून लवकर मदत मिळत नसल्याने संस्थेकडून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यात आली. या शेतकऱ्यांना नवीन प्रयोग करण्यासाठी प्रोत्साहन देत कार्यकत्रेही शेती क्षेत्रातील समस्यांवर अभ्यास करीत राहिले. परिणामी चांगले काम उभे राहते आहे. पोफळा गावातील शिवाजी गाडे यांना तीन एकरांत आता २२ क्विंटल उत्पादन घेता आले आहे. सगळेच प्रयोग चांगलेच झाले आहेत, असे पोकळ दावे करण्यापेक्षा झालेल्या चुका सुधारत कार्यकत्रे काम करीत असल्याचे कृषी अभ्यासक सुहास आजगावकर सांगतात. समस्येची व्याप्ती पाहता हे काम एवढे आहे की, प्रबोधनासह विविध कामांसाठी संस्थेला समाजाच्याही आíथक पाठबळाची गरज आहे.
संग्रहित लेख, दिनांक 27th Sep 2015 रोजी प्रकाशित
दुष्काळाशी लढणारी माणसं!
पोफळा हे ७०-७२ उंबऱ्याचे गाव. डोंगराला चिकटून वसलेले. टणक बेसाल्ट खडकामुळे पाणी मुरण्याचे प्रमाण नगण्यच.
Written by रत्नाकर पवार

First published on: 27-09-2015 at 05:02 IST
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farmers who fight with the drought