धाराशिव: कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या मौल्यवान दागदागिन्यांवर डल्ला मारणारे आरोपी अद्यापही फरार आहेत. गुन्हा दाखल होऊन तीन महिने उलटून गेले तरी चोरांचा मागोवा लागलेला नाही. हे प्रकरण तडीस नेण्यासाठी महंत चिलोजीबुवा, माजी धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी आणि तत्कालीन तहसीलदार सतीश राऊत यांची नार्को तपासणी करण्याची मागणी पुढे आली आहे. तुळजाभवानी पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तसे निवेदन सादर केले आहे. सतीश राऊत सध्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे स्वीय सहाय्यक आहेत.

जिल्हाधिकारी तथा मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिलेल्या आदेशानुसार डिसेंबर महिन्यात तुळजापूर पोलिसांनी तुळजाभवानी देवीचे महंत, धार्मिक व्यवस्थापक, सेवेदारी आणि मंदिर संस्थानमधील अज्ञात अधिकारी व कर्मचारी अशा सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या गंभीर प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश देशमुख हे करीत आहेत. या प्रकरणात महंत हमरोजीबुवा गुरु चिलोजी बुवा, महंत चिलोजी बुवा गुरु हमरोजी बुवा, महंत वाकोजीबुवा गुरु तुकोजी बुवा व महंत बजाजी बुवा गुरु वाकोजी बुवा या चार महंतासह मयत सहाय्यक धार्मिक व्यवस्थापक अंबादास भोसले, सेवेदार पलंगे व मंदिरातील अज्ञात अधिकारी, कर्मचारी अश्या सात जणांंचा समावेश आहे. या प्रकरणी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी स्वतंत्र तपास समिती गठीत केली असून डीवायएसपी दर्जाचा अधिकारी या गंभीर प्रकरणाचा तपास करीत आहेत. आमदार महादेव जानकर यांनी विधान परिषदेत गुन्हा नोंद करण्याबाबत टाळाटाळ केली जात असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. त्यानंतर उपसभापती डॉ नीलम गो-हे यांनी तक्रार देऊनही गुन्हा का नोंद होत नाही अशी विचारणा करीत अधिवेशन संपण्यापूर्वी गुन्हा नोंदविण्याबाबत राज्य सरकारला सूचित केले होते.

हेही वाचा : Maharashtra Sadan Scam: छगन भुजबळ पुन्हा अडचणीत? अंजली दमानिया यांच्या पाठपुराव्याला यश, नेमकं प्रकरण काय?

काय होते प्रकरण?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुळजाभवानी देवीच्या खजिन्यात विविध राजे-महाराजे, संस्थानिक, मुघल बादशाह, निजाम, पोर्तुगीज, डच आदींनी देवीला मोठ्या भक्तीभावाने अर्पण केलेल्या प्राचीन अलंकारांची संख्याही मोठी आहे. भाविकांनी मागील १४ वर्षांत श्रध्देपोटी देवीचरणी अर्पण केलेले वाहिक सोने २०७ किलो तर अडीच हजार किलो चांदी आहे. शिवकालीन दागिने, वेगवेगळ्या राजदरबारातील नाणी असा समृध्द खजिना तुळजाभवानी देवीच्या मंदिरात होता. त्यावरच मंदिरातील महंत, मंदिर समितीचे अधिकारी आणि कर्मचारी तसेच काही सेवादार्यांनी डल्ला मारला असल्याचे जिल्हाधिकार्‍यांकडे सादर करण्यात आलेल्या अहवालातून समोर आले. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी मंदिरातील सोने-चांदीचे दागिने व अलंकाराची तपासणी करण्यासाठी उमरगा येथील उपविभागीय अधिकारी गणेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली १६ जणांची समिती गठीत केली होती. या समितीने जुलै महिन्यात आपला सविस्तर अहवाल सादर केला. त्यानुसार महंतांच्या ताब्यातील दागदागिने, सेवेदारी, अधिकारी आणि कर्मचार्यांच्या अधिकार कक्षेत असलेले मौल्यवान प्राचीन अलंकार याची इनकॅमेरा तपासणी केली. त्यात अनेक प्राचीन, दुर्मिळ आणि मौल्यवान अलंकार गहाळ असल्याचे समोर आले होते. तर काही अलंंकार नव्याने त्या ठिकाणी ठेवून शेकडो वर्षे जुना असलेला दागिना गायब करण्यात आला आहे. अहवालानुसार जबाबदारी निश्चित करून संबंधित दोषींविरोधात कडक कायदेशीर कारवाई करण्यासाठी गुन्हा दाखल करण्यात आला होता.