छत्रपती संभाजीनगर : कन्नड तालुक्यातील पळसखेडा येथे बुधवारी (दि. २०) सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घरात झोपलेल्या एका ६५ वर्षीय वृद्ध शेतकऱ्यांवर बिबट्याने हल्ला केल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाला. सुभाष लक्ष्मण काकडे (वय ६५) रा. पळसखेडा असे हल्ल्यात मृत पावलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
पळसखेडा गावलगत पाण्याच्या टाकीजवळ सुभाष काकडे यांच्या नावे घरकुल मंजूर झाले होते. ते काम सुरू होते. बांधलेल्या निवाऱ्या ते बाजेवर झोपले होते. त्यांच्यावर बिबट्याने अचानक नरड्यावर हल्ला केला यात त्यांचा मृत्यू झाला. मुलगा गणेश याने यास वडिलांवर हल्ला झाल्याचे कळाल्यानंतर त्याने व गावकऱ्यांनी घराकडे धाव घेतली. या वेळी सुभाष काकडे मृत अवस्थेत आढळून आले. सुभाष काकडे यांना अर्धांगवायूच्या झाला असल्याने त्यांना प्रतिकार करता आला. या घटनेची माहिती मिळताच वनपरीक्षेत्र अधिकारी शिवाजी टोम्पे यांनी घटनास्थळास भेट दिली.