लातूर : भाजपच्या नव्या व्यवस्थेत मिसळून कसे जायचे, हा प्रश्न आहे अर्चना पाटील चाकुरकरांचा. नव्याने पालकमंत्री झालेल्या शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना त्यांनी तो विचारला आणि लातूरमध्ये भाजपमध्ये अजूनही नव्या – जुन्याचा वाद मिटला नसल्याचे स्पष्ट झाले. ‘जसा आहे तसे स्वीकारा आणि जसे पाहिजे तसे घडवा ’असा संघ मंत्र माहीत असणाऱ्या भाजपच्या बहुतांश नेत्यांनी भाजपमध्ये आलेल्या अर्चना पाटील चाकुरकरांना पूर्णत: स्वीकारले नसल्याचे त्यांच्या वक्तव्यातून दिसून येत आहे. विधान परिषदेतील रिक्त जागांची पार्श्चभूमीही नव्या – जुन्या वादाला असल्याचे सांगण्यात आले.

अन्य पक्षातील कार्यकर्ते भाजपमध्ये आल्यानंतर आपल्या हक्कावर ते गदा आणतात हीच भावना अनेक वर्षे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपात दाखल झालेल्या माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सुनबाई डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर यांना भाजपने उमेदवारी दिली. त्यावेळी जुन्यातल्या कोणालाही उमेदवारी द्या. नव्याने आलेल्या मंडळींना नको असा आग्रह पक्षश्रेष्ठीकडे धरण्यात आला होता. मात्र, निवडून येण्याचे निकष हा प्रमुख मुद्दा गृहीत धरून व सर्वेक्षणात ज्यांना जास्त मानांकन मिळेल त्यांनाच उमेदवारी देण्याचा निर्णय घेतलेला होता. या निकषाच्या आधारे डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर यांना उमेदवारी मिळाली. मात्र, त्यांचा पराभव झाला. सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम केलेले नव्हते. अशा तक्रारी निवडणूक निकालानंतर करण्यात आली. तो विसंवाद हा अजूनही सुरूच आहे. प्रत्येक जुनी मंडळी हे आम्ही कसे पक्षासाठी खस्ता खाल्या आहेत. ते नवे आहेत हा काही त्यांचा दोष नाही . ते पक्षासाठी काम करतात ,पक्ष जो निर्णय करेल तो शिरसावंद्य मानून काम करणे सर्वांनाच क्रमप्राप्त असते. ते केल्यानंतर आता विधान परिषदेच्या निवडणुकीत कोणाला संधी मिळेल यावरुन हा वाद पुढे आल्याचे सांगण्यात येते. निमित्त होते लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी नुकतीच ‘देवघर’ मध्ये भेट दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देवघर हे शिवराज पाटील चाकुरकर यांचे घर आहे. पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले हे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. त्यामुळे भाजपमध्ये मिसळून जाण्याचा प्रश्न त्यांनी विचारुन घेतला. त्या म्हणाल्या , ‘ २०१९ च्या निवडणुकीत शिवेंद्र राजे भाजपमध्ये आले व मी २०२४ च्या निवडणुकीत भाजपात आले. पालकमंत्री हे जुन्या नव्यांच्या वादावर बोलणे झाले. तेच मत जाहीरपणेही मांडले.’ आता या जुन्या नव्या वादात पालकमंत्र्यांनी सातारा जिल्ह्यात कसा मार्ग शोधला याचे मार्गदर्शन त्यांच्याकडून घेण्याचा मानस आहे, असे त्या म्हणाल्या.