Maharashtra Board Class 10 Result 2025 Updates छत्रपती संभाजीनगर – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या छत्रपती संभाजीनगर विभागीय मंडळाचा २०२५ चा निकाल ९२.८२ टक्के लागला. विभागाचा निकाल यंदा गतवर्षीच्या तुलनेत २.३७ टक्क्यांनी घसरला आहे. गनवर्षी गतवर्षी ९५.१९ टक्के होता.यंदा प्राविण्यश्रेणीतही घसरण झाली आहे. लातूर मंडळाचा निकाल ९२.७७ टक्के लागला
छत्रपती संभाजीनगर विभागात दहावीसाठी या वर्षी १ लाख ८५ हजार ४०७ विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली होती. त्यात एकूण उत्तीर्ण – १ लाख ७० हजार ७५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ३५ टक्क्यांच्या पुढे ११ हजार ६७९ उत्तीर्ण. ४५ % पुढे व्दितीय श्रेणीत ३८ हजार ७२४ उतीर्ण. प्रथमश्रेणीत ५५ हजार ७१ उत्तीर्ण तर प्राविण्यासह ६५ हजार २७६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
लातूर विभागाचा निकाल ९२.७७ टक्के निकाल लागला असून, या परीक्षेसाठी ९७ हजार ९९० उत्तीर्ण झाले. ३५ टक्क्यांवर ७ हजार ६७७ उत्तीर्ण झाले. ४५ टक्यांवर गुण घेणारे २४ हजार २८० उत्तीर्ण झाले. प्रथम श्रेणीत ३२ हजार ३३५ तर प्राविण्यासह ३३ हजार ६९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या परीक्षेसाठी लातूर विभागातून १ लाख ५ हजार ६१९ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यात १ लाख ७ हजार ८ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. त्यातील ९७ हजार ९९० उत्तीर्ण झाले.