छत्रपती संभाजीनगर : मनोज जरांगे यांची हत्ये करण्याचा कट रचणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून या आरोपींमधील एकाने हत्येचा कट बीडच्या नेत्याने रचला असल्याची माहिती आपणास दिली, असा दावा मनोज जरांगे यांनी केला आहे. वारंवार हे आरोपी बीडच्या नेत्यांच्या संपर्कात होते. मारणाच्या कटासाठी अडीच कोटी रुपयांचा व्यवहार ठरला होता, असेही जरांगे म्हणाले.

जालना पोलीस अधीक्षकांना मराठा आंदोलनातील कार्यकर्ते गंगाधर काळकुटे यांनी लिहिलेल्या तक्रारीत जरांगे पाटील यांच्या जीवे मारण्याची धमकी देऊन कट रचून देणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कारवाई करावी असे म्हटले हाेते. दादा गरुड आणि अमोल खुने अशी या दोन आरोपींची नावे काळकुटे यांनी पोलीस अधीक्षकांना लिहिलेल्या पत्रात दिली आहेत. या पत्रात एका राजकीय नेत्याचा सहभाग असल्याचे नमूद करण्यात आले होते. शुक्रवारी सकाळी झालेल्या पत्रकार बैठकीत मनोज जरांगे यांनी बीडचा नेता या आरोपींच्या संपर्कात असल्याचा आरोप केला. सत्कार केल्यानंतर फोटो फ्रेममध्ये कॅमरे लपवून ठेवणेे, सीटखाली दूरध्वनी लपवून ठेवून हेरगिरी करण्याला अधिक वेतन देणे, असे प्रकारही बीडमध्ये सर्रास सुरू असल्याचा जरांगे यांचा आरोप आहे.

कटाचा तपशील कसा ?

मनोज जरांगे म्हणाले, बीडचा एक कार्यकर्ता की पी. ए. दोन आरोपींची भेट झाली. त्याने या आरोपींना नेला. पहिल्यांदा खोटे व्हिडिओ बनविण्याचे ठरविले होते. मग खूनच करायचा असे ठरवले होते. काही औषध देऊन मारुन टाकू असे ठरले. बीडमधील कांचन नावाचा माणूस धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता आहे. त्याने परळीला नेला. या आरोपीस धनंजय मुंडे यांनी वेळ दिला. एक आरोपी आधीच या बैठकीत चर्चा. यात अडीच कोटी रुपयांमध्ये व्यवहार ठरवला. मुंबईला जाताना आरोपींबरोबर झाल्टाफाट्यावरही चर्चा झाली. या तपासात अनेक बाबींचा उलगडा होईल असे सांगण्यात आले. एक जुनी गाडी परराज्यातील क्रमांकाची असलेली गाडी देऊन अपघात घडवून मारण्याचा प्रयत्न करणार असल्याचे ठरवले आहेत.’ या दोन्ही आरोपींना अनेक बाबी माहीत असल्याचा दावाही जरांगे यांनी केला.

दादा गरुड यांनी आंतरवली सराटीमध्ये येऊन घातपात घडवून आणण्याचा प्रयत्न कसा सुरू आहे हे येऊन सांगितले होते. यात एक राजकीय कार्यकर्ता होता, असे लेखी तक्रारीत म्हटले आहे. गुरुवारी रात्री उशिराने गोंदी पोलीस ठाण्यात खूनाचा कट रचण्याच्या प्रयत्नांचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.