औरंगाबाद: आरोग्य भरतीपाठोपाठ आता म्हाडाच्या भरती परीक्षेच्या पेपरफुटीचे संबंध औरंगाबादमध्ये असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पुणे पोलिसांनी तिघांना सोमवारी अटक केली.  हे तिघेही जण खासगी  शिकवणीचे संचालक व कर्मचारी असल्याची माहिती पुढे आली आहे.

गणिताचे प्राध्यापक आणि टार्गेट करिअर अ‍ॅकॅडमीचा अजय नंदू चव्हाण, सक्षम अ‍ॅकॅडमीचा संचालक कृष्णा शिवाजी जाधव आणि अंकित संतोष चनखोरे  या तिघांना अटक करण्यात आली असून  हे  तिघेजण औरंगाबादच्या चिकलठाणा येथे राहणारे मुख्य सूत्रधार संतोष लक्ष्मण हरकळ आणि त्याचा भाऊ अंकुश रामभाऊ हरकळ यांच्याकडून प्रश्नपत्रिका विकत घेणार होते. पुणे येथील सायबर पोलिसांनी रविवारी अटक  केली.

lighting on trees for decoration, lighting on trees thane marathi news
ठाणे, कल्याण- डोंबिवली, मिरा भाईंदरमध्ये वृक्षांचा गळा घोटण्याचे कार्य सुरूच, उच्च न्यायालयाच्या नोटीस नंतरही शहरात वृक्षांवर विद्युत रोषणाई
foreign women prostitution, prostitution Kharghar,
वेश्याव्यवसायप्रकरणी परदेशी महिलांवर कारवाई
onine
नाशिकमध्ये पर्यायी कांदा बाजार सुरू; तरीही शेतकऱ्यांची लूट ?
gudi padwa in Nagpur
नागपुरात गुढीपाडव्याला सुमारे १५० बालकांचा जन्म, मुलींचा टक्का अधिक

 म्हाडा भरती परीक्षेच्या आयोजनाचे कंत्राट जी.ए.सॉफ्टवेअर कंपनीला देण्यात आले होते. या कंपनीचा संचालक डॉ. प्रितीश देशमुखने प्रश्नपत्रिका फोडल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.  संतोष हरकळ आणि त्याचा भाऊ अंकुश  हरकळ हे घोटाळ्यातील मुख्य आरोपींकडे औरंगाबाद शहरातील दोन खासगी शिवकवणी वर्गातील तीन प्राध्यापकांनी प्रश्नप्रत्रिकांची सर्वाधिक मागणी केल्याचे समोर आले.