scorecardresearch

ठाकरेंसोबतच्या १४ आमदारांपैकी एक म्हणतोय, ‘मैं हू डॉन’; डान्सचा भन्नाट Viral Video पाहिलात का?

आमदार उदय सिंग राजपूत यांचा एक व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरतोय. या व्हिडीओत उदय सिंग राजपूत ‘मैं हू डॉन’ या हिंदी गाण्यावर ठेका धरताना दिसत आहेत.

Uday Singh Rajput Shivsena MLA
गाण्यावर ठेका धरताना शिवसेना आमदार उदय सिंग राजपूत

औरंगाबाद : महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून राजकीय वातावरण तापले आहे. यामध्ये शिवसेनेचे ८ मंत्री व अनेक आमदार बंडखोर एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले आहेत. मात्र, कन्नडचे आमदार उदय सिंग राजपूत आजही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. अशातच आमदार उदय सिंग राजपूत यांचा एक व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरतोय. या व्हिडीओत उदय सिंग राजपूत ‘मैं हू डॉन’ या हिंदी गाण्यावर ठेका धरताना दिसत आहेत.

या व्हिडीओत आमदार उदय सिंग राजपूत एक लग्न समारंभात नाचताना दिसत आहे. डीजेवर ‘मैं हू डॉन’ हे गाणं लागलं आहे आणि राजपूत या गाण्यावर ठेका धरताना पाहयला मिळाले. विशेष म्हणजे ते नाचत असताना काही लोक त्यांच्यासोबत सेल्फी देखील काढत आहे. एका तरुणाने आमदार राजपूत यांना उचलून नाचण्याचा प्रयत्न केला. मात्र, राजपूत यांनी तरुणाला रोखत उचलण्यास नकार दिला. तसेच जमिनीवरच ठेका धरला.

राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण झालीय. शिवसेना पक्षात मोठी बंडाळी झालीय. अशा स्थितीतही आमदार उदय सिंग राजपूत उद्धव ठाकरे यांच्यासोबत खंबीरपणे उभे आहेत. इतकंच नाही तर ते आपल्या मतदारसंघांमध्ये येऊन नागरिकांच्या समस्या सोडवत आहेत. शिवसेना आमदारांनी बंड केल्यानंतर शिंदे गटात सामील न होता आमदार राजपूत उद्धव ठाकरेंसोबत ठामपणे उभे राहिले. गेल्या काही दिवसांपासून उदय सिंग राजपूत चांगलेच चर्चेत आले आहेत.

उदय सिंग राजपूत म्हणाले होते की, मला बंडखोरीची कुणकुण लागताच मी फोन बंद करून गावाकडे आलो. उद्धव ठाकरे यांच्यामुळे आमदार झालो. त्यामुळे मी शिंदे गटात सामील झालो नाही. परंतु, गावाकडील काही तालुक्यांमधील नागरिकांच्या समस्या सोडवायच्या होत्या. काही विवाह कार्य होती. त्यामुळे मी माझा फोन बंद करून गावाकडे आलो.

आता राजपूत यांचा एका लग्नात ‘मैं हू डॉन’ या हिंदी चित्रपटाच्या गाण्यावर ठेका धरल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत.

मराठीतील सर्व औरंगाबाद ( Aurangabad ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Viral video of shivsena mla uday singh rajput dancing on main hu don pbs

ताज्या बातम्या