इटलीतील लोकप्रिय दुचाकी कंपनी दुकाटीने आपल्या नव्या डुकाटी व्ही ४ या बाईकवरून पर्दा हटवला आहे. 2023 ducati diavel v4 बाईकला बाह्य अपडेट्स मिळाले आहेत. त्याचबरोबर बाईकला अंडरपिनिंग आणि इलेक्ट्रॉनिक्स अपडेट्स देखील मिळाले आहेत.

तीक्ष्ण आकाराचे मजबूत फ्युअल टँक, विशाल एअर इन्टेक, पातळ टेल सेक्शन आणि रुंद टायर्समुळे ही बाईक बळकट दिसून येते. बाईकच्या पुढील भागात दोन सी आकाराचे एलईडी डेटाईम रनिंग लाईट्स, एलईडी हेडलॅम्प्स आणि हँडलबारवर डायनामिक टर्न इंडिकेटर्स देण्यात आले आहेत. बाईकला मॅट्रिक्स डिजाईन असलेले अनोखे एलईडी टेललाईट देण्यात आले आहेत. ही बाईक लाल आणि काळ्या रंगामध्ये उपलब्ध आहे.

(हिवाळ्यात कार सुरू केल्यानंतर लगेच चालवू नका, इंजिनवर होईल वाईट परिणाम, ‘या’ टीप्स फॉलो करा)

डुकाटीने बाईकच्या चॅसीमध्ये देखील बदल केले आहे. त्यामुळे डायव्हेल १२६० एस च्या तुलनेत तिचे वजन १३ किलो कमी आहे. बाईक थोडी हल्की झाली आहे. स्टिल ट्रेलिस फ्रेम ऐवजी अल्युमिनियम मोनोकोकचा वापर केल्यामुळे वजनात फरक पडला आहे. बाईकमध्ये परिस्थितीशी पूर्णत: जुळवून घेणारे ५० एमएम इन्वहर्टेड फोर्क बसवण्यात आले असून कॅन्टिलिव्हर पॅटर्न शॉक देण्यात आले आहेत.

DUCATI
(source – ducati)

इंजिन देते इतकी पावर

बाईकमध्ये १ हजार १५८ सीसी व्ही ४ ग्रान्टुरिझ्मो इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन १६८ बीएचपीची शक्ती आणि १२६ एनएमचा पीक टॉर्क निर्माण करते. इंजिनमध्ये काउंटर रोटेटिंग क्रँकशाफ्ट देण्यात आले आहे जे जायरोस्कोपिक प्रभाव कमी करते. कार्यक्षम राहण्यासाठी इंजिनला देखिल तसे डिझाईन करण्यात आले आहे. बाईक थांबलेली असताना मागिल दोन सिलेंडर बंद करण्यासाठी ते सक्षम आहे.

DUCATI
(source – ducati)

(ई स्कुटरच्या विक्रीमध्ये मोठी वाढ; ‘या’ कंपनीने केला नवा विक्रम)

इलेक्ट्रॉनिक फीचर्सच्या बाबतीत बोलायचे झाले तर, बाईकमध्ये ५ इंच टीएफटी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले टेलिमेट्री माहिती देते आणि त्यातून रायडिंग मोड बदलता येते. बाईकमध्ये तीन पावर मोड आणि चार रायडिंग मोड देण्यात आले आहेत. स्पोर्ट, टुरिंग, अर्बन आणि वेट असे चार रायडिंग मोड देण्यात आले आहे. बाईकमध्ये ब्ल्युटुथ कनेक्टिव्हिटी देखील मिळते जे डिस्प्लेवर टर्नबाय टर्न नेव्हिगेशन दाखवण्यात मदत करते.

DUCATI
(source – ducati)

इतकी आहे किंमत

2023 ducati diavel v4 पुढील काही महिन्यात भारतीय बाजारात लाँच होऊ शकते. या बाईकची किंमत डायव्हेल १२६० पेक्षा अधिर असू शकते. डायव्हेल १२६० ची एक्स शोरूम किंमत २०.४९ लाख रुपये आहे.