दिग्गज दुचाकी उत्पादक कंपनी होंडाने आपली अद्ययावत Hornet 2.0 बाईक सादर केली आहे. ही दुचाकी नवीन BS6 फेज-II आणि OBD2 उत्सर्जन मानकांनुसार अपग्रेड केलेल्या इंजिनसह लाँच करण्यात आली आहे.

सिंगल-चॅनल ABS ने सुसज्ज नवीन बाईक

२०२३ हॉर्नेट २.० ला नवीन ग्राफिक्स आणि मोठ्या इंधन टाकीसह आक्रमक स्वरूप प्राप्त झाले आहे.
तसेच, ऑल-एलईडी लाइटिंग, स्प्लिट सीट, लहान मफलर आणि १०-स्पोक अलॉय व्हील डिझाइनसह अॅल्युमिनियमचे तयार फूटपेग्स स्पोर्टी लुक वाढवतात.

सेगमेंट-फर्स्ट फीचर म्हणून, नवीनतम बाईकला गोल्डन अप-साइड डाउन (USD) फ्रंट फोर्क मिळतो.
यात सिंगल-चॅनल ABS सोबत ड्युअल-पेटल डिस्क ब्रेक्स फ्रंट आणि रियर, इंजिन-स्टॉप स्विच, हॅझर्ड लाइट्स, साइड स्टँड इंडिकेटर यांसारखी वैशिष्ट्ये देखील आहेत.

(हे ही वाचा : Hyundai Creta टिकणार नाय? तब्बल ३२ सेफ्टी असलेली सर्वात सुरक्षित अन् स्वस्त कार देशात दाखल, किंमत… )

नवीन Hornet 2.0 बाईकमध्ये इंजिन अपडेट करण्यात आले आहे. 2023 Honda Hornet 2.0 मध्ये PGM-FI, १८४.४०cc, ४ स्ट्रोक, सिंगल-सिलेंडर इंजिन आहे जे १२.७०kW पॉवर आणि १५.९Nm पीक टॉर्क निर्माण करते. नवीनतम बाईकची पिकअप आणि चालविण्याची क्षमता सुधारण्यासाठी एक्झॉस्टमध्ये देखील बदल करण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

किंमत

ही बाईक १.३९ लाख रुपये (एक्स-शोरूम) किंमतीत सादर करण्यात आली आहे.