देशातील सर्वात मोठी कार कंपनी म्हणून देशात मारुती सुझुकीचा डंका आहे. Maruti Dzire ही कंपनीची लोकप्रिय कार आहेत. मारुती कंपनीच्या या कारला खूप मागणी आहे. बऱ्याच काळापासून ते अपडेट न केल्यामुळे,ते हायब्रिड आवृत्तीमध्ये लाँच होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. आता कंपनी यंदा ही कार लाँच करण्याची शक्यता आहे.

मारुती सुझुकी डिझायर ही कॉम्पॅक्ट सेडान कार सेगमेंटमध्ये सर्वाधिक विक्री होणारी कार आहे. २०२४ वर्ष सुरू झाले आहे आणि अशा परिस्थितीत कंपनी ग्राहकांसाठी नेक्स्ट जनरेशन डिझायर लाँच करण्याच्या तयारीत आहे. अलीकडेच ही कार चाचणी दरम्यान दिसून आली आहे. सध्या ह्युंदाई ऑरा आणि होंडा अमेझ सारख्या कार बाजारात उपलब्ध आहेत. यावेळी नवीन डिझायरमध्ये काहीतरी नवीन आणि खास पाहायला मिळेल का, ते जाणून घेऊया.

डिझाइनमध्ये मोठे बदल होणार

रिपोर्ट्सनुसार, मारुती सुझुकी नवीन डिझायरच्या डिझाइनमध्ये अनेक मोठे बदल करू शकते. त्याच्या समोर एक नवीन बोनेट, बंपर आणि हेड लाइट्स दिसू शकतात. याशिवाय कारच्या साईड प्रोफाइलवरही काम केले जाणार आहे. नवीन डिझायरच्या मागील लूकमध्येही बदल करण्यास पूर्ण वाव आहे. नवीन बंपर आणि LED टेल लाईट्स येथे देखील मिळू शकतात.

(हे ही वाचा : बाकी कंपन्यांचे धाबे दणाणले, सुझुकी कंपनीची नवी कोरी बाईक भारतात दाखल, किंमत… )

केबिन आणि वैशिष्ट्ये

लीक झालेल्या रिपोर्ट्सनुसार, नवीन डिझायरच्या इंटीरियरमध्येही मोठे बदल केले जाऊ शकतात. त्याची केबिन राखाडी आणि बेज रंगांमध्ये आढळू शकते. यामध्ये एक नवीन क्लस्टर आणि इन्फोटेनमेंट सिस्टीम पाहता येईल. कारमध्ये अनेक नवीन फीचर्स देखील मिळू शकतात.

इंजिन आणि पॉवर

सध्याच्या Dezire मध्ये ११९७ cc चे पेट्रोल इंजिन आहे जे CNG पर्यायासह उपलब्ध आहे. असे मानले जाते की, नवीन मॉडेलचे इंजिन पुन्हा ट्यून केले जाऊ शकते, ज्यामुळे पॉवर आणि मायलेजचे संयोजन अधिक चांगले होऊ शकते.

New Dezire किंमत

सध्या Dezire ची किंमत ६.५६ लाख रुपयांपासून सुरू होते. त्यामुळे नवीन मॉडेलच्या किमतीतही वाढ होऊ शकते, असे मानले जात आहे. हे नवे मॉडेल यावर्षी भारतात लाँच होणार असल्याची माहिती आहे.