सुखद, समस्या विरहित प्रवास होण्यासाठी आणि चांगले मायलेज मिळवण्यासाठी कारची काळजी घेणे गरजेचे आहे. तुम्ही रोज कार चालवण्यापूर्वी काही गोष्टींची खात्री करून घेतली तर तुमचा प्रवास आरामदायक होऊ शकतो आणि तुमच्या वाहनाचे आयुष्य देखील वाढू शकते.
१) रोज टायर प्रेशर तपासा
वाहनाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी टायर्स चांगल्या स्थितीत असणे गरजेचे आहे. रोज टायर प्रेशर तपासले पाहिजे. याने वाहनाचे मायलेज सुधारेल, तसेच ते झिजणार नाहीत आणि टायर फुटण्याचे टळेल. ज्या दिवशी तुम्ही वाहनात इंधन भराल त्या दिवशी टायर्समधील हवा देखील तपासा.
२) तेल आणि तेल फिल्टर बदला
कारमध्ये अनेक हलणारे भाग असतात आणि ते लुब्रिकेंटशिवाय सुरळीत चालू शकत नाहीत. यात तेल मोलाची भूमिका बजावते. तेल हलत्या भागांना लुब्रिकेट करते आणि घर्षणामुळे निर्माण होणारी उष्णता शोषूण घेते. मात्र, दीर्घकाळापर्यंत वापर केल्यानंतर तेल आणि तेल फिल्टर बदलणे आवश्यक आहे, कारण जमा झालेली धुळ आणि इतर दुषित घटक वाहनातील हलत्या भागांच्या कार्यक्षमतेत अडथळा आणू शकतात.
३) ब्रेक फ्लुईड तपासा
दर महिन्याला ब्रेक फ्लुईड तपासण्याचा सल्ला दिला जातो. मास्टर सिलेंडरचे झाकन उघडण्यापूर्वी त्यावरील घाण पुसून टाका. फ्लुईडची गरज असल्यास कार निर्मात्याने सांगितलेले फ्लुईड टाका. त्याऐवजी ट्रन्समिशन किंवा पॉवर स्टिअरिंग फ्लुईड टाकू नका. तसेच, पूर्वी उघडलेल्या डब्यातील ब्रेक फ्लुईडचा वापर करू नका.
(आता ई वाहनांसाठी नव्या सुरक्षा चाचण्या, अनेक दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर सरकारचा निर्णय)
४) बॅटरीची देखभाल आवश्यक
वाहनाची बॅटरी स्वच्छ ठेवा. घाणीमुळे विद्युत प्रवाह संपू शकतो. बॅटरी पुसण्यासाठी थोडे ओले कापड घ्या. बॅटरीचे पोस्ट्स किंवा त्याचे टर्मिनल स्वच्छ करायचे विसरू नका. इग्निशन बंद असताना कार चालू ठेवणे टाळा, याने बॅटरीच्या आयुष्याला हानी पोहोचते.
५) तडे पडलेले विंडशिल्ड दुरुस्त करा
तडे असलेल्या विंडशिल्डमधून समोरचे पाहणे कठीण जाते. विंडशिल्डला तडे पडले असल्यास ते दुरुस्त करा.
६) कारचे इंजिन स्वच्छ करा
शुद्ध इंधनाचा वापर करण्याशिवाय इंजिनला आतून स्वच्छ करण्यासाठी इतर पर्याय नाहीत. मात्र, वेळोवेळी इंजिन बाहेरून स्वच्छ केले पाहिजे. धुळ असलेल्या गळतीने इंजिन खराब होऊ शकते. म्हणून चिकटपणा दूर करण्यासाठी इंजिन क्लिनरचा वापर करा.