शहरात किंवा आंतरजिल्हा प्रवासासाठी २५० सीसी बाईक चांगला पर्याय ठरू शकतात. या बाईक्स चांगला मायलेजही देतात आणि रस्त्यावर त्यांची कामगिरीही चांगली असते. तुम्ही २५० सीसी सेगमेंटमधील बाईक घेण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला काही बाईक्सची माहिती देत आहोत. या बाईक्स परडवणाऱ्या किंमतीत उपलब्ध आहेत. त्यांची किंमत २ लाख रुपयांपेक्षा कमी आहे. तुमचे बजट २ लाख रुपयांपर्यंत असेल तर मग या बाईक्स तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतात.

१) बजाज पल्सर एन २५०

Bajaj Pulsar N250 सिंगल चॅनल एबीएस व्हेरिएंट ही सर्वाधिक परवडणारी २५० सीसी बाईक आहे. तिची किंमत १.४० लाख असून ती केटीएम २५० ड्युकपेक्षाही स्वस्त आहे. बाईकचे वजन १६२ किलोग्राम असून ती २४.५ एचपीची शक्ती आणि २१.५ एनएमचा टॉर्म निर्माण करते.

२) यामाहा एफझेड २५

Yamaha FZ 25 बाईकमध्ये २५० सीसीचे इंजिन मिळते. बाईकमध्ये स्पिलट सीट, एलईडी हेडलॅम्प मिळतात. बाईक ४३ किमीचा मायलेज देत असून ती २०.८ एचपीची शक्ती आणि २०.१ एनएमचा टॉर्क निर्माण करते. या बाईकची किंमत १ लाख ४७ हजार ९०० रुपये आहे.

(पेट्रोल कार सीएनजीमध्ये बदलायची आहे? मग ‘हे’ करा)

३) बजाज डोमिनार २५०

Bajaj Dominar 250 या बाईकमध्ये २५० सीसी लिक्विड कुल इंजिन मिळते. हे इंजिन शक्तीशाली असून ते २७ एचपीची शक्ती आणि २३.५ एनएमचा टॉर्क निर्माण करते. या बाईकची किंमत १ लाख ८१ हजार ४०० रुपये आहे. मात्र, ही बाईक वजनी आहे. बाईकचे वजन १८० किलोग्राम आहे.

४) सुझुकी जिक्सर २५०

Suzuki Gixxer 250 ची किंमत १ लाख ८१ हजार ४०० रुपये आहे. बाईक आनंददायी प्रवासाचा अनुभव देते. ती २६.५ एचपीची शक्ती आणि २२.२ एनएमचा टॉर्क निर्माण करते. बाईकमध्ये ऑइल कुल्ड, सिंगल सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे.

(फ्लिपकार्टवर ई स्कुटर्सच्या पर्यायांत वाढ, उपलब्ध केली ‘ही’ वाहने)

५) क्यूजे मोटर एसआरसी २५०

QJMotor SRC 250 या बाईकची किंमत १ लाख ९९ हजार रुपये आहे. ही यादीतील सर्वात महागडी बाईक आहे. बाईकमध्ये ऑइल कुल्ड २४९ सीसी पॅरेलल ट्विन इंजिन मिळते, जे १७.४ एचपीची शक्ती आणि १७ एनएमचा टॉर्क निर्माण करते. बाईकला रेट्रो लूक मिळालेला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सदर सर्व बाईक्स या २५० सीसी सेगमेंटमधील आहेत. देण्यात आलेल्या किंमती या एक्सशोरूम (दिल्ली) किंमती आहेत. तुम्ही बजेटनुसार यांच्यातील कुठलीही बाईक निवडू शकता अथवा इतर पर्याय शोधू शकता.