अॅपलच्या सेल्फ-ड्रायव्हिंग कारबाबत एक मोठे अपडेट आले आहे. स्टीयरिंग व्हील किंवा पॅडल्सशिवाय पूर्णपणे स्वयंचलित असलेल्या या कारच्या लाँचची तारीख २०२६ पर्यंत पुढे ढकलली गेली आहे. खरं तर ही कार २०२५ मध्ये लाँच करण्याची चर्चा रंगली होती. एका नवीन अहवालात असे सांगण्यात आले आहे की, टेक कंपनी अॅपलच्या सेल्फ-ड्राइव्ह प्रकल्पाचे नाव टायटन आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, प्रोजेक्ट टायटनच्या आयोजकांच्या लक्षात आले आहे की अॅपलची सेल्फ-ड्रायव्हिंग कार सध्या स्टीयरिंग व्हील किंवा पेडल्सशिवाय तयार करणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही.

अॅपलने एक सेल्फ-ड्रायव्हिंग वाहन डिझाइन केले आहे ज्यामध्ये स्टीयरिंग व्हील आणि पेडल्सचा समावेश आहेत. अपडेटेड प्रोजेक्ट टायटन डिझाइन कारची सेल्फ-ड्रायव्हिंग क्षमता राष्ट्रीय महामार्गांपुरती मर्यादित आहे. त्यामुळे अॅपलच्या सेल्फ ड्रायव्हिंग कार उपक्रमाला थोडा वेळ लागेल.

( ही ही वाचा: आतापर्यंतची सर्वात प्रगत ऑल-इलेक्ट्रिक जग्‍वार रेस कार ‘आय-टाइप ६’ लाँच, JAGUAR TCS रेसिंगबद्दल वाचा सविस्तर)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काय असेल इलेक्ट्रिक कारची किंमत

अॅपल या कारवर बऱ्याच काळापासून काम करत आहे. ब्लूमबर्गच्या एका अहवालात असे सांगितले आहे की, अॅपलच्या पहिल्या इलेक्ट्रिक कारची किंमत USD १००,००० म्हणजेच (८२.५१ लाख) पेक्षा कमी असेल. मात्र त्याच्या लाँचची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. आधी या कारची किंमत १२०,००० म्हणजेच (सुमारे ९९ लाख) अपेक्षित होती. मात्र आता पूर्णपणे स्वयंचलित ड्रायव्हिंग टेक्नॉंलॉजी आणि प्रगत वैशिट्याच्या अभावामुळे ही कार २०,००० USD स्वस्त होण्याची अपेक्षा आहे.